Police investigate the late-night firing incident near Umbraj on the Pune-Bengaluru Highway as tension grips the Karad region. saam tv
महाराष्ट्र

पुणे-बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबाराने कराड तालुक्यात खळबळ, भाईगिरीतून गँगवॅार

Midnight Firing Incident On Pune Bengaluru Highway Karad: पुणे-बेंगलोर महामार्गावर कराडजवळ मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार; एक तरुण गंभीर जखमी. मित्रांतील वाद की गँगवॉर? पोलिसांचा तपास सुरू.

Omkar Sonawane

संभाजी थोरात, साम टीव्ही

कराड: पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रजवळ असलेल्या इंदोली फाटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास अंदाधुंद गोळीबाराची थरारक घटना घडली आहे.या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जखमी तरूणावर कराड येथील कृष्णा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

मित्रांमधील वाद की गँगवॅार?

मिळालेल्या माहितीनुसार, हा गोळीबार मित्रांमधील पैशांच्या व्यवहारातील वादातून झाला की भाईगिरीच्या वर्चस्वातून झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे. गोळीबारात जखमी झालेली व्यक्ती मसूर भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. संशयित आरोपीनी पीडित तरुणावर 4 ते 5 गोळ्या झाडल्याचे बोलले जात आहे. यापैकी दोन गोळ्या जखमी तरुणाच्या दोन्ही पायात लागल्या आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला आहे. या हल्लेखोरांच्या मागावर आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे महामार्ग परिसर आणि कराड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान शिरुर तालुक्यातील करडे गावात भररात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भैरवनाथ मंदिर परिसरात आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर दोन फेऱ्या गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रसंगावधान राखत संबंधित तरुणाने पाण्यात उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. शनिवारी पहाटे करडे गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घेरून त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली संबंधित तरुणाने जीव वाचवण्यासाठी जवळील पाण्यात उडी घेत अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून सुटका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काका मला वाचवा, अचानक शिंदे मोदींच्या भेटीला, शिवसेनेचा वाद मोदींच्या कोर्टात?

मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 'वनरंग २०२६' चे उद्घाटन, ३ दिवस सुरू राहणार उत्सव

NCPला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला? प्रशांत किशोर NCPचे नवे सल्लागार?

जळगाव हादरले! शाळा परिसरातच दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने सपासप वार; जुन्या वादातून जीवघेणा हल्ला

धिंड आरोपींची, कारवाई पोलिसांवर; मानवाधिकार आयोगाच्या निर्णयावर पुणेकर संतप्त

SCROLL FOR NEXT