

अंबाबाई मंदिरात पावसाळ्यात गळती होत असल्याची बाब समोर आली आहे.
पुरातत्व विभागाकडून सुरू असलेले जतन आणि संवर्धनाचे काम वादाच्या भोवऱ्यात
मंदिराच्या मूळ शिल्पकलेचे आणि ऐतिहासिक वास्तूचे नुकसान
रोहित कदम, साम प्रतिनिधी
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून जोरदार काम सुरू आहे. मात्र, आता अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या संवर्धन कामादरम्यान छतातून गळती झाल्याचे समोर आलंय. याचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. अशातच आता छताचं सिमेंट काढताना ग्राईंडर वापरल्यानं मंदिरातील मूळ शिल्पांचं नुकसान झाल्याचा आरोप भाविकांनी केलाय. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
इतकंच नव्हे तर, पुरातत्व विभागाच्या कारभारामुळे अंबाबाई मंदिरासह इतरही मंदिरं धोक्यात असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. तर दुसरीकडे, मंदिर शिखरावर पावसाचे पाणी झिरपत असल्याने दगडी भागावर झुडपे आणि गवत उगवू लागले होते. याबाबतही मंदिर अभ्यासकांनी चिंता व्यक्त केलीये.
अंबाबाई मंदिर संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर सर्व तांत्रिक निकषांचे पालन करूनच काम करत असल्याचा दावा पुरातत्त्व विभागाने केलाय. मात्र, यासंदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमावर अद्याप पुरातत्त्व विभाग किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. मात्र या गळतीची गंभीर दखल घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.