Maharashtra News Live Update: भंडारा जिल्ह्यात एनसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई!

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, राज्यातील राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv
Published On

भंडारा जिल्ह्यात एनसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई!

अंमली पदार्थ तस्करांविरोधात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने भंडारा जिल्ह्यातील साकोली परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. एका वाहनातून तब्बल २४५ किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीडकरांसाठी मोठी बातमी! १७ सप्टेंबरपर्यंत परळीपर्यंत रेल्वे धावणार

बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून जनतेचे सर्व प्रश्न आणि विकासकामे मी अत्यंत निष्ठेने पार पाडत आहे, अशी ग्वाही खासदार बजरंग सोनवणे यांनी आज दिली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज खासदार सोनवणे यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वेल्डिंग करताना कंटेनरला भीषण आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

लातूरच्या उदगीर तालुक्यातील वाढवणा येथे कंटनेरला वेल्डिंग करत असताना भीषण आग लागली, या आगीत कंटेनर मधील एका कंपनीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे, आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवल्याने जीवित हानी टळली आहे., मात्र या आगीत प्रचंड मोठं नुकसान झाले

माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचले

रायगड ब्रेकिंग :

० माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचले

० जोरदार पाऊस सुरू असून नाले व्यवस्था ठिक नसल्याने महामार्गावर पाणी साचले

० साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालक आणि पादचाऱ्यांना करावी लागत आहे कसरत

० माणगावमधील कार्तिक हॉटेल आणि इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे दरम्यान महामार्गावर पाणी साचले

० ढालघर फाटा येथे देखील सखल भागातील दुकानात पावसाचे पाणी शिरले

वसई-विरार शहराला पावसाने झोडपले

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या वसई फाटा येथील मुख्य रस्ता जलमय झाला असून रस्त्यावर

पाणी साचले आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांसह प्रमुख रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

पावसामुळे संपूर्ण परिसरात काळेकुट्ट ढग दाटून आले असून वातावरणात गारवा निर्माण झाले आहे.

साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून वाहतुकीचाही वेग मंदावला आहे.

पाऊस कायम राहिल्यास सखल भागांतील पाणी साचण्याची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी निवडणूक.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. एकूण 580 अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी 255 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशीच 160 अर्ज दाखल करण्यात आले. पण ही निवडणूक बिनविरोध करण्याचा स्थानिक नेतृत्वाचा प्रयत्न असणार आहे. महाविकास आघाडी प्रणित पॅनलकडून सर्व 23 मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी 16 जुलैपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने तोपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात, असे सांगितले.

रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट

हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. आजपासून पुढील तीन तासात रायगड सह पुणे आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळ पासूनच जिल्ह्यात दाट ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे आणि

Thane : ठाण्यात पावसाचा जोर वाढला

संध्याकाळ च्या सुमारास ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. वंदना सिनेमा या ठिकाणी गुडघ्या एवढे पाणी साचले आहे. पालिकेचा नालेसफाई चा दावा फोल ठरला आहे. याचाच आढावा घेतला आहे.

डोंबिवली एमआयडीसी निवासीत झाडे कोसळण्याचे सत्र कायम 

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात पावसाळा सुरू झाल्यापासून झाडे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आज दुपार सुमारास मिलापनगर येथील ग्रीन्स स्कूलजवळ एक मोठे कडुनिंबाचे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावर नवीन बांधलेल्या पुलाचा माती भराव खचला

रायगडमधुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावर नवीन बांधलेल्या पुलाचा माती भराव खचला आहे. माणगाव लोणेरे दरम्यान माणगाव शहरालगत काळ नदीवर हा नवीन पुल बांधण्यात आला आहे. बांधकाम पुर्ण झाल्यानंतर पुलावरून वाहतुक सुरु करून 15 दिवस उलटले नाहीत तोच भराव खचल्याचे निदर्शनास आले आहे. मातीचा भराव खाचल्याने डांबरी रस्त्याला देखल तेढे गेले आहेत. या सर्व घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाचे काम समोर आले आहे.

राम मंदिर देणगी भ्रष्टाचार प्रकरणा विरोधात धुळ्यात महाविकास आघाडी आक्रमक 

धुळ्यात महाविकास आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष एकत्र येत आयोध्या येथील राम मंदिरातील भ्रष्टाचारा विरोधात निषेध करण्यासाठी धुळे शहरातील राम मंदिरात निषेध आंदोलन करण्यात आले आहे,

पुणे-सोलापूरात अन्न व औषध प्रशासनाचा धडक दणका; हजारो लिटर दूध नष्ट, अनेक परवाने निलंबित 

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत भेसळीचा संशय, अस्वच्छ उत्पादन आणि नियमभंग करणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या आस्थापनांवर मोठी कारवाई केली. हजारो लिटर दूध व अन्नसाठा नष्ट करण्यात आला असून अनेक अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

बुलढाणा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी आ.संजय गायकवाड पुत्रांचा एल्गार

पोलीस अधीक्षकांचं निलंबन न केल्यास एक जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा.

बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या विरोधात घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले

आजपासून वर्धा जिल्ह्यातील 1,454 शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

- दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या.

- येळाकेळी येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा.

- जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती.

- नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, औक्षण आणि पायांचे ठसे जतन करून अनोख्या पद्धतीने स्वागत.

- पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वितरण

पुण्यातील विश्रांती नगर परिसरात गवा अडकला

विठ्ठलवाडी या ठिकाणी कॅनल रोड मध्ये गवा अडकलेला असून बचावासाठी रेस्क्यू टीम काही वेळात पोहोचत आहे तसेच घटनास्थळी पोलीस प्रशासन व फायर ब्रिगेड दाखल झाले आहे .

ठाकरे यांनीही शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारावं- अब्दुल सत्तार

एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हे विश्वास ठेवण्यासारखे असल्यानं सचिन अहिर हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. आणखी उरले सुरले आमच्याकडे येतील. आता ठाकरे यांनीही शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारावे. जेव्हा ठाकरे महाराष्ट्रात येतात तेव्हा मुंबईत आमदार फुटतात आणि ते ज्यावेळी मुंबईत लक्ष घालतात तेव्हा उर्वरित महाराष्ट्रातील खासदार फुटतात

जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित डुप्लिकेट सहीप्रकरणी मोठी घडामोड; चामोर्शी नगरपंचायतीच्या नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित डुप्लिकेट सहीप्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चामोर्शी नगरपंचायतीच्या नगरसेवक आशिष पिपरेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या पोलीस कोठडीदरम्यान आरोपीची सखोल चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस येते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

कल्याण कोळसेवाडीत जिममधील डंबेलच्या वादातून हल्ला लहान भावानंतर मोठ्या भावालाही बेदम मारहाण

महिनाभरापूर्वी जिममध्ये व्यायामादरम्यान डंबेल वापरण्याच्या कारणावरून भाऊ आदर्श पाठकला सोनू भाई गँगने केली बेदम मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबईतील वाशी भाजी मार्केट पावसामुळे कोसळलं

मुसळधार पावसामुळे वाशी येथील भाजी मार्केट कोसळलं

त्यामुळे भाज्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे

Nanded : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या कंधार मध्ये सत्याग्रह आंदोलन.

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. नांदेडच्या कंधार मध्ये देखील सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. देशातील इतर राज्यात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यात आले आहे.

Sachin Ahir News : उद्धव ठाकरे यांना मोठा झटका! आमदार सचिन अहिर यांचा शिंदेसेनेत प्रवेश

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा मेळावा

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. महायुतीकडून काल दूध संस्थांचे ठराव दाखल करण्यात आल्यानंतर आज काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून ठराव दाखल करण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ भागातील कारखान्यावर छापा

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ भागातील कारखान्यावर छापा

पुणे विभागाच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स चा छापा

मोठ्या ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरून छापेमारी

कुरकुंभ एमआयडीसी मधील फार्मास्युटिकल कंपनी वर अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स ची धाड

जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई

जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त

विभागीय आणि जिल्हास्तरीय गुणनियंत्रण भरारी पथकाची संयुक्त कारवाई

युरिया इंडस्ट्रियल वापरासाठी जात असल्याचा कृषी विभागाला संशय

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये झाड कोसळून ११ वाहनांचे नुकसान तर एक जण किरकोळ जखमी

ठाण्यातील वागळे पोलीस ठाण्याजवळ प्रशांत कॉर्नर परिसरात आज सकाळी झाड कोसळून ११ वाहनांचे नुकसान झाले. या घटनेत ऑफिसला पायी जात असलेले ५२ वर्षीय पवन झा यांच्या डोक्याला व छातीला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्रगती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे महापालिकेच्या एकाच आरोग्य केंद्राचे दोनदा लोकार्पण

पुणे महापालिकेच्या एकाच आरोग्य केंद्राचे दोनदा लोकार्पण

श्रेय घेण्यावरून भाजप राष्ट्रवादीत खडाजगी

सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

नवी मुंबईमध्ये पावसाची विश्रांती

सायन पनवेल महामार्ग वाहतूक कोंडी होत असल्यामुळे मुंबईच्या दिशेने प्रवाशांची गाडी चालवताना दम चाक होताना दिसून येत आहे

Latur : पिक विम्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक

पिक विम्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक

60 महसूल मंडळांपैकी केवळ दोन मंडळांना विमा

पिक विमा द्या अन्यथा कार्यालय फोडू – शिवसेना (शिंदे गट)चा इशारा

Pune: साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट, ड्युटीवर मद्यप्राशन करणाऱ्या डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल

साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट; ड्युटीवर मद्यप्राशन करणाऱ्या डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल

साम टीव्हीने उघडकीस आणलेल्या शिरूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील ड्युटीवर मद्यप्राशन करणाऱ्या डॉक्टर प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे.

पोलिसांनी वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित डॉक्टरविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Pune: भीमाशंकरच्या पावसाने भिमा प्रवाहित; जलपूजन करून नदीचे उत्साहात स्वागत

भीमाशंकरच्या पावसाने भिमा प्रवाहित; जलपूजन करून नदीचे उत्साहात स्वागत

भीमाशंकर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे उगमस्थानी भिमा नदीला प्रवाह सुरू झाला आहे.

या प्रवाहित जलाचे स्वागत करत खेड तालुक्यात भिमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन करण्यात आले.

Nashik: नाशिकच्या लासलगावमधील जैन मंदिरात चोरी घटना उघडकीस

नाशिक- लासलगावमधील जैन मंदिरात चोरी घटना उघडकीस

नाशिकच्या लासलगाव येथील दिगंबर जैन मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी मंदिराची भिंत तोडून आत प्रवेश करून मूर्ती चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रात्री २ वाजेच्या सुमारास मंदिराची भिंत फोडून आत प्रवेश केला.

तर मंदिरातील देवांची मूर्ती, मौल्यवान चांदीची छत्रे आणि मंदिरातील भंडारा पेटी फोडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास लासलगाव पोलीस करत आहेत.

Pune: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाच्या भावाला पाठवली १० कोटींची नोटीस

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट

आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाच्या भावाला पाठवली १० कोटी रुपयांची नोटीस

वकील पत्र घेण्यावरून झाला होता काल कोर्टात वाद

सियानेही सांगितलं होतं श्रीवास्तव्यांना तुम्ही माझी वकील नाहीत तुम्ही बोलू नका

या सगळ्या वादा नंतर श्रीवास्तव्यांनी पाठवली नोटीस

Amravati: मेळघाटातून २०० हून अधिक आदिवासी मुले शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर स्थलांतर

अमरावती -

मेळघाटातून २०० हून अधिक आदिवासी मुले शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर स्थलांतर

स्थानिक शाळांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह

Buldhana: लोणार तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर, शेतात साचले पाणी

बुलडाणा -

लोणार तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; शेतात साचले पाणी, पेरणी वाहून

देऊळगाव कुंडपाल परिसर जलमय; चार तासांच्या सततधार पावसाने शेतकरी हवालदिल

Nashik: TCS प्रकरणात मोठी अपडेट, पीडित तरुणीचे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात उघड

नाशिक -

- TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं शोषण आणि धर्मांतरण प्रकरण

- धर्मांतरासाठी वर्षभरापासून नियोजनबद्ध कट रचल्याचा एसआयटीकडून न्यायालयात केलेल्या चार्जशीटमध्ये दावा

- पीडित तरुणीचे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात उघड

- ५ एप्रिल २०२५ ला पीडितेचे नाव बदलण्यासाठी आरोपींनी गुगलवर शोध घेतल्याचा पुरावा

- पीडितेला हनिया हे नाव देण्यासाठी इंटरनेटवर सर्च केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख

- पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे आरोपींनी ताब्यात घेतल्याचा आरोप

- बेकायदेशीर नामांतर करून बदललेल्या नावाने ९ हजार रुपयांची जकात भरल्याचा दावा

- एसआयटीने या सर्व बाबींचे पुरावे न्यायालयात सादर केल्याची माहिती

Nashik: TCS प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानसह तिघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी 

नाशिक -

- TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण

- संशयित आरोपी निदा खानसह तौसिफ अत्तार आणि दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

- यापूर्वी संशयित आरोपींचे वकील आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद झाला आहे पूर्ण

- आज निदा खानसह इतरांच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता

- TCS कंपनीतील पीडित महिलेला जबरदस्तीने धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा संशयितांवर आहे आरोप

Nashik: नाशिक महापालिकेची आज महासभा, ४ हजार पानांची श्वेतपत्रिका सादर होणार

नाशिक -

- नाशिक महापालिकेची आज महासभा, आज होणाऱ्या महासभेत आज ४ हजार पानांची श्वेतपत्रिका सादर होणार

- २०२२ ते २०२६ या चार वर्षांतील प्रशासकीय कामकाजाचा लेखाजोखा श्वेतपत्रिकेत असणार

- आयुक्त मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांकडून कामे, खर्च आणि आर्थिक व्यवहारांची माहिती संकलित

- खड्डेमुक्त रस्ते, पाणीपुरवठा, अतिक्रमण, अपूर्ण विकासकामे, महापालिकेची आर्थिक स्थिती आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी या मुद्द्यांवर महासभेत चर्चा होण्याची शक्यता

- शहरातील विकास कामं, रस्ते, पाणीपुरवठा या मुद्द्यांवर महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता

Nagpur: आज विदर्भातील शाळेचा पहिला दिवस, सुट्टीनंतर आज शाळांमध्ये गुंजणार किलबिलाट

आज विदर्भातील शाळेचा पहिला दिवस, सुट्टीनंतर आज शाळांमध्ये गुंजणार किलबिलाट

नागपुरातील पंडित बच्छाराज व्यास शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं खास पद्धतीने स्वागत

रांगोळी काढून ढोल वाजवत, फुलांचा वर्षाव करत मुलांचं पहिल्या दिवशी स्वागत...

पहिल्या दिवशी मुलांचा चेहऱ्यावर वेगळा आनंद...

Wardha: वर्धा जिल्ह्यात स्मार्ट मीटरला तीव्र विरोध, नागरिकांचा संताप उफाळला

वर्धा

वर्धा जिल्ह्यात स्मार्ट मीटरला तीव्र विरोध, नागरिकांचा संताप उफाळला

- घोडेगाव-कोळणा येथील नागरिकांनी घरांवरील स्मार्ट मीटर काढून महावितरणच्या पुलगाव कार्यालयावर धडक.

- "हे स्मार्ट मीटर तुम्हीच ठेवा, आम्हाला जुनेच मीटर हवे," अशी नागरिकांची ठाम भूमिका.

- खरीप हंगामातील शेतीची कामे बाजूला ठेवून महिला-पुरुष मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी.

- स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिले दुप्पट-तिप्पट आल्याचा नागरिकांचा आरोप.

- विश्वासात न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविल्याचा आक्षेप.

- यापूर्वी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने नागरिकांचा आक्रमक पवित्रा.

- स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर पुन्हा बसविण्याची जोरदार मागणी.

Nagpur: नागपूरमध्ये बॉम्बे स्कूटर्स या इमारतीचा काही भाग कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

नागपूर -

- नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यू गांधीबाग परिसरात भयंकर घटना

- बॉम्बे स्कूटर्स या इमारतीचा काही भाग कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

- या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील हा भाग कोसळला.

- या दुर्घटनेत एका कारसह तीन मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे.

- या घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले....मलबा हटविण्याचे कामही सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com