Mid day meal, Chhatrapati Sambhajinagar, Students saam tv
महाराष्ट्र

Saam Impact News : झोपलेल्या सरकारला साम टीव्हीच्या बातमीने आली जाग ! विद्यार्थ्यांसाठी झाली मध्यान्ह भोजनाची व्यवस्था

Mid Day Meal for Students: लोकसहभागातून मुलांना मध्यान्ह भोजन देण्याची वेळ आलेल्या शाळांवर आली हाेती.

डॉ. माधव सावरगावे

Mid Day Meal Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 70 टक्के जिल्हा परिषद आणि खासगी शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अखेर दोन महिन्यांनंतर शालेय पोषण आहार मिळाला. उर्वरीत 30 टक्के शाळांना येत्या दोन दिवसांत पोषण आहार मिळणार आहे अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. (Breaking Marathi News)

दोन आठवड्यापूर्वी साम टीव्हीने छत्रपती संभाजीनगरसह राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांना दीड महिन्यांपासून शालेय पोषण आहार दिला जात नाही या आशयाचे वृत्त प्रसारित केले. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले. सरकारने तातडीने ठाेस पावले उचलत शालेय पोषण आहार देण्यासाठी उपाययाेजना केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार देण्यासाठी शाळांवर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून उसनवारीची वेळ आली होती. कारण, पोषण आहारासाठी लागणारी डाळ, तांदूळ, तेल, तिखटमीठही संपले होते. हा शालेय पोषण आहार शासन स्तरावरून वाटप केला गेला नाही अशी बातमी साम टीव्हीने दाखविताच शासनाने उपाययाेजना केली.

त्यामुळे लोकसहभागातून मुलांना मध्यान्ह भोजन देण्याची वेळ आलेल्या शाळांत अखेर सोमवार- मंगळवारी शालेय पोषण आहाराचे साहित्य वाटप सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के शाळांना साहित्य मिळाले असून उर्वरित ३० टक्के शाळांना दोन दिवसांत पुरवठा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

Roshani Walia : 'सन ऑफ सरदार २' मध्ये झळकणारी रोशनी वालिया कोण आहे?

SCROLL FOR NEXT