wardha news saam tv
महाराष्ट्र

Wardha Bogus Seeds Factory : वर्ध्यातील बोगस बियाणे कारखान्यात महाराष्ट्रातील 14 नामांकित कंपन्यांच्या नावाखाली झाला गाेरखधंदा

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : वर्धेच्या म्हसाळा येथे पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या बोगस कापूस बियाणे कारखाना प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजू जयस्वाल हा मागील तीन वर्षांपासून बोगस बियाण्याचा कारभार करत असल्याच समोर आले आहे.  (Maharashtra News)

सन 2020 पासून राजूने हा व्यवसाय सुरु केला होता. सुरवातीला मध्यप्रदेशच्या पांढुर्णा येथून तर आता गुजरात राज्यातून बोगस बियाणे आणून वर्धेत रिपॅकिंग करीत असे. एवढंच नव्हे तर तो गुजरात येथूनच रिकामी पॉकेट आणत असे. महाराष्ट्रात परवानगी असलेल्या बियाण्याचे पाकीट छापून त्यात बियाणे भरून त्याची विक्री केली जात असे.

पोलिसांनी संशयितांकडून तब्बल 1 लाख 18 हजार 13 विविध कंपनीचे बनविलेले पाकीट जप्त केले आहे. महाराष्ट्रातील 14 नामांकित कापूस बियाणे कंपनीचे बनावटी पाकीट तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

सोमवारी मध्यरात्री म्हसाळा या परिसरात सुरु असलेल्या बोगस कापूस बियाण्याच्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. पोलीस अधीक्षक नुरूल हसन (SP Noorul Hasan) यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कारवाईमुळे अनेक शेतकरी फसण्यापासून वाचले. /

या प्रकरणाचा तपास सुरु असताना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुख्य संशयित आरोपी राजू जयस्वाल याच्याकडून अनेक माहिती समोर येत आहे. राजू जयस्वाल हा 2020 पासून बोगस कापूस बियाण्याचा काम करत असल्याच समोर आले आहे.

तीन वर्षांपासून सुरु हाेता गैरकारभार

सुरवातीला जयस्वाल हा सेलू तालुक्याच्या रेहकी येथे मध्यप्रदेशच्या पांढुर्णा येथून बियाणे आणत रिपॅकिंग करून विकत होता. 2021 मध्ये त्याची ओळख वर्धेतील गजू ठाकरे याच्या मार्फत गुजरातच्या अहमदाबाद येथील ईडर येथील लोकांशी झाली आणि तेथून बियाणे आणायला सुरवात केली. तेव्हापासून गुजरात राज्यातून बियाणे येत होते. एका महिन्यापूर्वी त्याने स्वतःचा कारखाना वर्धेच्या म्हसाळा परिसरात स्थलांतरित केला. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या कारभारचा अखेर पोलिसांनी भंडाफोड केला.

कसून तपास सुरु

राजू जयस्वाल हा गुजरात येथूनच लहान प्लास्टिक पॉकेट बोलवत त्याला स्वतः प्रिंट करत होता. त्याने महाराष्ट्रातील 14 नामांकित कापूस बियाणे कंपनीचे (mhasla bogus seeds factory) बनावटी पॅकेट तयार केले होते. पोलिसांनी 1 लाख 18 हजार 13 बनावटी पॅकेट विविध कंपनीचे एकूण 11 लाख 80 हजार 130 रुपयाचे पॅकेट जप्त केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण दहा संशयितांना अटक केली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांचे विविध पथक वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत. यात आणखी काही महत्वाच्या बाबी समोर येतील अशी माहिती पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT