Laxman Hake Viral Video  Saam Tv
महाराष्ट्र

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, रोख नेमका कुणाकडे? राजकीय वर्तुळात खळबळ

Laxman Hake Viral Video: सध्या सोशल मीडियावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते काही नेत्यांबाबत वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Priya More
  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा तो व्हिडीओ व्हायरल

  • व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

  • व्हिडीओतील वक्तव्यांमुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा सुरू

  • लक्ष्मण हाके यांनी व्हिडीओमध्ये अनेक नेत्यांची नावं घेतली आहेत

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते काही नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लक्ष्मण हाके यांचा रोख नेमका कुणाकडे होता? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

व्हिडीओमध्ये ते 'मुख्यमंत्र्यांना भेटायला तो, पुतण्या आणि मुलगा गेले होते', असा उल्लेख करत असल्याचे दिसत आहे. तसेच, 'त्या नेत्याचं बोलणं मला खटकलं होतं.', असेही ते म्हणताना व्हिडीओत ऐकू येत आहे. या वक्तव्यांमुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण साम टीव्हीने या व्हिडीओची अधिकृत पुष्टी केलेली नाही. बीडमध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

लक्ष्मण हाके वायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाले?

'त्याला आपल्यामागे फरफट व्हायला लागली आहे. ते कसे आहे त्याच्याकडे हाय यंत्रणा आहे. त्याच्याकडे संघटना आहे, मग ती मीडिया हॅडल करणं, मग मोठा स्टेज डेकोरेट करणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणे. त्याने एकदा आंदोलन करायचे ठरवले. मी दुसऱ्या दिवशी आंदोलन जाहीर केले. जीआरची होळी करायची. माझ्या उपस्थितीत म्हटलं आंदोलन थांबवा मी त्या स्टेजवर उपस्थित होतो. आंदोलन थांबवा. हा दोन उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला. घेऊन कोणाला गेला स्वतःचा पुतण्या आणि स्वतःचा पोरगा असे तिघेजण... सगळ्यांना सांगतो ते तिघे आणि आम्ही तिघे होतो हे मला लय खटकलं होतं वाक्य. पण आता जाऊदे म्हटलं, आपल्या मागे उभे राहू शकतात ते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि बावनकुळे.'

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, 'तिथल्या व्यवस्थेविरोधात मी बोलत आहे. ओबीसी आरक्षण जे आजपर्यंत डावललं गेलं याबद्दल बोलत आहे. ओबीसीच्या बाजूने कुठले मंत्री, आमदार, खासदार बोलायला तयार नाहीत. या व्हिडीओमधून काय प्रतित होत आहे. दाखवायचा तर पूर्ण व्हिडीओ दाखवावा. माझा रोख सत्ताधारी, मंत्री आणि विरोधाकांकडे आहे. दोन ते तीन वेळा कट केलेला व्हिडीओ लावला आहे. त्या व्हिडीओतून काय बोध घ्यायचा. '

तसंच, 'हा व्हिडीओ कधीचा आहे हे मी सांगू शकत नाही. व्हिडीओ जुना आहे हे नक्की. कुणी तरी खोडसाळपणा केला आहे. पण लक्ष्मण हाके थांबत नाही. लक्ष्मण हाकेवर दगड घालून पाहिले, गाड्या फोडून बघितल्या, महिलांना अंगावर सोडून पाहिले. सर्व उद्योग करून झाले पण लक्ष्मण हाके कुणाच्या बापाला घाबरत नाही. महाराष्ट्रातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या हक्क आणि अधिकारासाठी लढणारा लक्ष्मण हाके आहे. त्यामुळे असल्या गोष्टींना मी भीक घालत नाही. लक्ष्मण हाकेला बदनाम करणं हा यामगचा हेतू आहे.', असे देखील लक्ष्मण हाके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा 'ॲक्शन मोड'वर! आता राज्यातील रुग्णालयांना दिला थेट कारवाईचा इशारा; काय आहे कारण?

Gautami Patil : "हिल हिल पोरी हिला तुझ्या प्रेमात झालो फिदा..."; गौतमी पाटीलचा नखरा पाहून नेटकरी घायाळ, 'ते' Photos आले समोर

Bleeding Gums: दात घासताना हिरड्यांतून रक्त येतंय? दुर्लक्ष करू नका; असू शकते गंभीर समस्येची सुरुवात

Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT