MHADA Mumbai x
महाराष्ट्र

Mhada News: म्हाडाकडून मुंबईत 12 हजार घरांची निर्मिती; सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न होणार पूर्ण

Mhada Housing Lottery: ही घरे स्थानिक सोसायट्यांच्या सहकार्याने विकसित केली जातील. म्हाडाकडून एकत्रित पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध केली जाणार आहेत.

Bharat Jadhav

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण म्हाडाकडून पाच वर्षांत मुंबईतील विविध परिसरात पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाकडून कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यात येणार आहेत. यातून म्हाडाला 12,000 पेक्षा अधिक घरांचा साठा उपलब्ध होणार आहे. यात गोराई, मुलुंड, कांजुरमार्ग, जुहू, बांद्रा, ओशिवरा आणि गोरेगाव आदी परिसरात घरे उपलब्ध होतील.

अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत. या गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व घरांची विक्री ऑनलाइन लॉटरी प्रणालीद्वारे होणार आहे.

कुठे असणार घरे

गोरेगाव - मोतीलालनगर : या ठिकाणी म्हाडाने बांधकाम आणि पुनर्विकास संस्था म्हणून अदाणी समूहाची निवड केलीय. त्यानुसार येथील रहिवाशांना 1600 चौरस फुटांची मोठी घरे उपलब्ध केली जाणार आहेत.म्हाडाच्या मालकीच्या जमिनीवर विकास आराखड्यानुसार सुमारे 8000 घरे उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

जुहू - जेवीपीडी नगर: गुरु नानक बध्दविकास योजनेतून घरांची निर्मिती केली जाणार आहे. 2500 चौरस फूट क्षेत्रफळाचे स्पेसिअस फ्लॅट्स असणार आहेत. किंमत सुमारे 600–700 कोटींच्या प्रकल्पात समाविष्ट असणार आहे.

कांजुरमार्ग: एकात्मिक पुनर्विकास प्रकल्पातून घरांची निर्मिती.

सुमारे 5000 घरे उपलब्ध होतील असा अंदाज आहे. 400 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची घरं असणार आहेत. विविध गटांसाठी (EWS, LIG, MIG) घरांची रचना करण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा तसेच वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत एकूण 5,285 सदनिका, तसेच ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आलीय. या सोडतीसाठी अर्ज नोंदणी आजपासून सुरू झालीय.

घरे रेहॅबिलिटेशनच्या जागांमध्ये नव्याने विकसित केली जातील.

बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच या घरांची लॉटरी जाहीर केली जाणार.

प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mhada.gov.in) वेळोवेळी माहिती तपासावी.

अर्ज कसा करायचा?

सर्व अर्ज ऑनलाईन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे संपूर्ण व अचूक माहिती असावी. पात्रतेच्या आधारावर संगणकीकृत प्रणालीद्वारे लॉटरी काढली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maalik-Aankhon Ki Gustaakhiyan Collection : राजकुमार राव की विक्रांत मेस्सी, तिकीट खिडकीवर कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Morning Nutrition: डाएटिंग न करता वजन कमी करायचंय? सकाळी हे ५ नाश्ते खा अन् मिळवा स्लिम आणि फिट शरीर

भर मंडपात नवरीला उचलून नवरदेवाचा भन्नाट डान्स; VIDEO VIRAL

धक्कादायक! कसारा स्थानकात रेल्वेच्या टीसीकडून चिमुरडीचा विनयभंग, आईची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Income Tax Return: आता आयटीआर फाइल केल्यावर रिफंड कधी मिळणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT