MHADA employees to receive festive Diwali bonus – official announcement brings joy. saam tv
महाराष्ट्र

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

MHADA Diwali Bonus 2025: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात 'म्हाडा'च्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ 'म्हाडा'नेही कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केलीय.

Bharat Jadhav

  • म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा.

  • रेल्वे कर्मचाऱ्यांनंतर म्हाडा कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी.

  • बोनस दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार.

दसरा-दिवाळीच्या या दिवसांमध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच बोनसची अपेक्षा असते. एक दिवसापूर्वीच रेल्वे कर्मचाऱ्यांना ७५ दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आलाय. रेल्वे कर्मचाऱ्यांनंतर म्हडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. (MHADA Employees Get Festive Gift with Diwali Bonus )

म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या साधारण एका महिन्याच्या आधीच बोनस मिळणार आहे. हो, अगदी खरं तुम्ही जे वाचत आहात ते अगदी खरंय, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात देण्यासाठी एका मोठ्या निधीला मंजुरी दिलीय. दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हाडा कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडलीय. म्हाडाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे जाहीर केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

'म्हाडा'च्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनसची घोषणा करण्यात आलीय. म्हाडाने आपल्या कर्मचाऱ्यांना 25000 रुपये दिवाळीचा बोनस जाहीर केला जाणार आहे. 2024 मध्ये अर्थात गेल्या वर्षी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 23000 रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा मात्र कर्मचाऱ्यांना फक्त 2,000 रुपयांनी दिवाळी बोनसमध्ये वाढ करून त्यांना देण्यात येईल.

दरम्यान दिवाळी बोनसचा प्रस्ताव म्हाडाच्या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडला होता. अधिकाऱ्यांनी चर्चेनंतर हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला. निर्णयामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT