Meteorological Department has predicted heavy rain in Maharashtra today weather updates Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Updates: राज्यात आज तुफान पाऊस बरसणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, वाचा IMD अंदाज

Maharashtra Rain Alert: मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Satish Daud

Maharashtra Rain Updates: संपूर्ण ऑगस्ट महिन्यात दडी मारल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं. सलग दोन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा सरी कोसळल्या. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. (Latest Marathi News)

मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने राज्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. सध्या राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, खरीप हंगामातील पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची गरज आहे. अजूनही काही भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.

अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाचा इशारा (Weather Alert) दिला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल. मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणात देखील पावसाची शक्यता (Rain Updates) वर्तवण्यात आली आहे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी बाळगावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती देखील निर्माण झाली आहे.

हळुहळू या चक्रीय स्थितीचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होत आहे. पुढील काही तासांत हा पट्टा मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. येत्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस सोमवार १८ सप्टेंबपर्यंत राज्याच्या विविध भागात सुरू राहील, असा असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare: अदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री, 'डिटेक्टिव धनंजय' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Maharashtra Live News Update : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मनाने राष्ट्रवादीत; राम सातपुते यांचा खोचक टोला

Diljit Dosanjh: अमिताभ बच्चन यांच्या पाया पडणं पडलं महागात; खलिस्तानीकडून प्रसिद्ध गायकाला आणखी एक धमकी

Julie Yadav: मोबाईल घरी विसरली म्हणून पुन्हा घरी गेली आणि...! भारतीय महिला हॉकी खेळाडूचा अपघतात मृत्यू

Maharashtra Government : राज्यातील गुंठेवारीला अधिकृत परवानगी, राज्यपालांचा अध्यादेश

SCROLL FOR NEXT