PAK vs Sl Match Updates Big blow to Pakistan fast bowler Naseem Shah out of Asia Cup 2023 tournament
PAK vs Sl Match Updates Big blow to Pakistan fast bowler Naseem Shah out of Asia Cup 2023 tournamentSaam TV

PAK vs SL: 'करो या मरो' सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू आशिया कपमधून बाहेर

PAK vs SL Asia Cup 2023: पाकिस्तानचा मॅचविनर खेळाडू आशिया कपमधून बाहेर पडलाय. टीम इंडियाविरुद्ध खेळत असताना या खेळाडूला गंभीर दुखापत झाली होती.
Published on

PAK vs SL Asia Cup 2023: आशिया कप २०२३ स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केलाय. आज म्हणजेच गुरुवारी पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन संघात सुपर-४ फेरीतील सामना होणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर होणारा हा सामना दोन्ही संघासाठी करो या मरोच असणार आहे. दरम्यान, या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

PAK vs Sl Match Updates Big blow to Pakistan fast bowler Naseem Shah out of Asia Cup 2023 tournament
Asia Cup 2023: टीम इंडियाची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; जाणून घ्या विजयाची ५ मोठी कारणं

पाकिस्तानचा मॅचविनर खेळाडू आशिया कपमधून (Asia Cup 2023) बाहेर पडलाय. टीम इंडियाविरुद्ध खेळत असताना या खेळाडूला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो थेट मैदानामधून बाहेर पडला होता. इतकंच नाही, तर त्याने आपल्या ओव्हर्स देखील पूर्ण केल्या नव्हत्या. त्याचबरोबर तो बॅटिंगसाठी देखील मैदानात उतरला नव्हता.

हा खेळाडू दुसरा कुणी नसून पाकिस्तानचा (Pakistan) वेगवाग गोलंदाज नसीम शहा आहे. नसीम शहा याला टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग दरम्यान उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ४९ व्या ओव्हरनंतर तो मैदानाबाहेर गेला होता. या दुखापतीमुळे नसीम बॅटिंगलाही येऊ शकला नाही.

नसीमला दुखापतीमुळे टीम इंडिया (Team India) विरुद्ध पूर्ण १० ओव्हरही टाकता आल्या नाहीत. नसीमने ९.२ ओव्हरमध्ये ५३ धावा दिल्या. आता तो थेट आशिया कपमधून बाहेर पडल्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान पाकिस्तानचा आणखी एक स्टार बॉलर हरीस रऊफ हा देखील दुखापतग्रस्त आहे. रऊफ दुखापतीतून पू्र्णपणे सावरलेला नाही. रउफला या दुखापतीमुळे टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात बॉलिंग करता आली नव्हती. ५ ओव्हर्स टाकून तो मैदानाबाहेर गेला होता. तुर्तास तरी हरीस आशिया कपमधून बाहेर पडलेला नाही.

आशिया कप 2023 साठी सुधारित पाकिस्तान टीम

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाझ, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, जमान खान आणि शाहीन आफ्रिदी.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com