Nanded News Saam TV
महाराष्ट्र

Nanded News : लहान मुलांसह, महिला आणि पुरुष जळत्या निखाऱ्यावर चालले; नांदेड जिल्ह्यातील अघोरी प्रथा

Nanded News : जवळपास 12 ते 15 फूट निखारे येथे अंथरलेले होते. त्यावरून भाविक पायात काही न घालता चालत होते. लहान मुलेही या निखाऱ्यावरून जात होते.

Ruchika Jadhav

संजय सूर्यवंशी

Nanded News :

नांदेड जिल्ह्यातील एका महादेव मंदिरात जळत्या निखाऱ्यातून चालण्याची प्रथा आजही पाळली जाते. शेकडो भाविक पायात काही न घालता अनवानी पायांनी या निखाऱ्यातून चालतात. अर्धापूर तालुक्यातील पाटनुर येथील अपरंपार मंदिरातील हा प्रकार आहे.

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी रात्री ही प्रथा पाळली जाते. काल शनिवारी पंचक्रोशीतील हजारो भाविक अपरंपार मंदिरात दर्शनासाठी आले होते. जवळपास 12 ते 15 फूट निखारे येथे अंथरलेले होते. त्यावरून भाविक पायात काही न घालता चालत होते. लहान मुलेही या निखाऱ्यावरून जात होते.

जळत्या निखाऱ्यातून गेल्याने रोगराई दूर होते, संपत्ती प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांसाठी ही श्रद्धा असली तरी खरेतर हा अंधश्रध्देचा प्रकार आहे.

आपल्या पायाच्या त्वचेला तीन सेंकद अग्निचा स्पर्श झाल्यास चटके बसत नाहीत, हे वैज्ञानिक कारण आहे. यात कुठलीही श्रद्धा नाहीये.त्यामुळे भाविकांनी अशा अंधश्रद्धा असलेल्या प्रथा पाळू नये. आपला जीव धोक्यात घालू नये.

अशा घटनेत अनेक भाविकांना भाजते परंतु कोणी समोर येऊन सांगत नाहीत. त्यामुळे अशा आघोरी प्रथांना भाविकांनी बळी पडू नये, असे आवाहन अनिसचे कार्यकर्ते प्रा. लक्षीमन शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT