Minister Meghana Bordikar seen allegedly threatening a Gramsevak during a public interaction, sparking widespread criticism. Saam Tv
महाराष्ट्र

Meghana Bordikar: मंत्री बोर्डीकरांची ग्रामसेवकाला धमकी? तुला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकीन

Another Shock for Mahayuti Government: महायुतीतील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका काही केल्या संपत नाहीय. त्यातच आता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विधानानं पुन्हा एकदा महायुती सरकारच्या अडचणी वाढवलेत. बोर्डीकर नेमकं काय म्हणाल्य़ा? सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी काय आरोप केलाय?

Suprim Maskar

मंत्री माणिकराव कोकाटेंचा सभागृहातील रम्मी खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आमदार रोहित पवारांनी पुन्हा नवा व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याचा आणि बडतर्फ करण्याचा इशारा देत असल्याचं पाहायला मिळतयं.

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण, असा टोलाही त्यांनी ट्विटमधून लगावलाय.

दुसरीकडे माझा राग लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता, असं म्हणत बोर्डीकर यांनी रोहित पवारांना अर्धवट माहितीवर जनतेची दिशाभूल करु नका असा इशारा दिलाय..एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी महायुती सरकार अडचणीत येत आहेत. अधिवेशनात रमी खेळणारे आणि असंवेदशील वक्तव्यांमुळे माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं नुकतच काढून घेतलं आहे. वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा डागाळत असल्याने मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा क्लास घेत तंबी दिलीय. मात्र तरीही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच आहे. बोर्डीकर यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात ? त्यांना पाठिशी घातलं जाणार की कडक समज दिली जाणार? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT