Only Marathi Jobs in Bank  Saam Tv News
महाराष्ट्र

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Only Marathi Jobs in Bank : मराठी आंदोलनानंतर आता एक मेसेज व्हायरल होतोय. बँकांमध्ये मराठींना नोकरी दिली जाणार आहे. एका बँकेनेही तशी जाहिरात काढलीय. पण, खरंच असं आहे का? या मेसेजची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Prashant Patil

संदीप चव्हाण, साम टिव्ही

महाराष्ट्रात बँकेत आता मराठींसाठी मेगा भरती होणार आहे...तसा मेसेजही व्हायरल होतोय...लोकल बँक ऑफिसर म्हणून आता स्थानिकांना नोकरी दिली जातेय...हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेक गरजूंना यामुळे फायदा होणार आहे...? पण, व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे का...? सध्या मराठी हिंदी वाद पेटलाय...त्यामुळे चुकीचा मेसेजही व्हायरल होऊ शकतो...याची सत्यता जाणून सत्य माहिती दाखवणं गरजेचं आहे...त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर यामध्ये मराठी भाषेसाठी 485 रिक्त जागा आहेत. या पदासाठी योग्य असणाऱ्या सर्व मराठी मुलांपर्यंत ही जाहिरात पोचवा. हा मेसेज व्हायरल झाल्याने याबाबत माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमने थेट बडोदा बँकेशी संपर्क साधला...त्यावेळी आम्हाला या जाहिरातीसंदर्भात माहिती मिळाली...पण, लोकल बँक ऑफिसरचं काय काम असतं हे आम्ही अर्थतज्ज्ञांकडून जाणून घेतलं...

व्हायरल सत्य

बडोदा बँकेच्या नावाने व्हायरल होणारा मेसेज खरा

लोकल बँक ऑफिसर पदासाठी 485 रिक्त जागा

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असावी

उमेदवाराला मराठी बोलता, लिहता यायला हवं

रिझव्ह बँकेच्या शेड्युल यादीतील बँकेत 1 वर्षाचा अनुभव हवा

बँक ऑफ बडोदा बँकेनं देशभरात 2500 नोकऱ्या उपलब्ध केल्यायत. त्यासाठी प्रत्येक राज्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलंय. महाराष्ट्रात मराठी येणाऱ्यांसाठी 485 नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठी अर्ज भरण्यासाठी 24 जुलैपर्यंत वेळ देण्यात आलीय. बँकेच्या ऑफिशिएल वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत बँकेनं मराठींसाठी भरती काढल्याचा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT