Medha Market Committee Election Results , Satara, shivendraraje bhosale, shashikant shinde, makrand patil saam tv
महाराष्ट्र

Medha Market Committee Election Results : भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांच्या राजकीय खेळीस यश; 18 - 0 ने जिंकला मेढ्यातील सामना

मेढ्यात शेतक-यांनी नेत्यांवर दाखविला विश्वास.

ओंकार कदम

Medha Krushi Utpanna Bazar Samiti Election Results : मेढा बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनलने एक हाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या आहेत. यंदा ही निवडणुक भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने एकत्र येत लढवली होती. (Breaking Marathi News)

मेढा बाजार समितीचे मतदान शुक्रवारी पार पडले. यामध्ये 18 पैकी सहा जागा यापुर्वीच बिनविरोध झाल्याने 12 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही निवडणुक एकत्र लढवली. या पॅनेलच्या विरोधात महाविकास आघाडी, ठाकरे गट, राष्ट्रवादीचा दुसरा गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येऊन लढले होते.

या निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील या तिघांनी एकत्र येत मेढा बाजार समितीवर यश मिळविले. सातारा जिल्ह्याला भाजपने राष्ट्रवादीबराेबर एकत्र येत निवडणुकी लढल्याचे समीकरण पाहायला मिळाले.

राष्ट्रवादीचे दीपक पवार, ठाकरे सेनेचे सदाशिव सपकाळ यांनी एकत्र येत त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. शेतक-यांनी भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र केलेल्या शेतकरी विकास पॅनलला भरभरून मते दिल्याचे आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत विरोधकांना मेढा बाजार समितीत खाते सुद्धा उघडता आलेले नाही तर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना आठ, एनसीपीचे आमदार मकरंद पाटील यांना पाच तसेच आमदार शशिकांत शिंदेंना पाच जागांवर विजय मिळाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: आज किती खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

IND vs AUS 1st Test: भारताचा पर्थमध्ये एकतर्फी विजय! बुमराह, जयस्वालसह हे खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

Habit: आनंदी जीवनाचं रहस्य; 'या' 9 गोष्टी आत्ताच करा फॉलो

Maharashtra Travel : महाराष्ट्रातील चंद्रकोर आकाराचा समुद्रकिनारा, पर्यटकांची होते गर्दी

Bapusaheb Pathare News : वडगावशेरीत बापूसाहेब पठारेंनी राखला शरद पवारांचा गड; विजयानंतर दिली पहिली प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT