रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा आकर्षक ऑफर आणली आहे. कंपनीने नेहमीच किफायतशीर दर आणि प्रीमियम सेवा या दोन्ही गोष्टींचा तोल राखला आहे. यूजर्सना स्वस्तात अमर्यादित कॉलिंग, भरपूर डेटा आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे जिओचे वैशिष्ट्य बनले आहे. या वेळेस जिओ काही असे पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन्स घेऊन आली आहे जे कमी किमतीत ७५ जीबीपर्यंत डेटा आणि विविध अतिरिक्त फायदे देतात.
ग्राहकांसाठी उपलब्ध असलेला नवीन पोस्टपेड रिचार्ज प्लॅन विशेष लक्षवेधी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ३० जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा दिली जाते. त्यासोबतच जिओ टीव्हीचा मोफत प्रवेश मिळतो. जे मनोरंजनप्रेमींकरीता मोठा फायदा ठरतो. याशिवाय सबस्क्राइबर्सना जिओ होमच्या दोन महिन्यांच्या मोफत ट्रायलसह जिओ एआय क्लाउडवर ५० जीबी क्लाउड स्टोरेजचीही सुविधा मिळते. जी यूजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
जिओचा आणखी एक उच्च श्रेणीतील पोस्टपेड प्लॅन ७५ जीबी डेटा देतो. विशेष बाब म्हणजे या प्लॅनअंतर्गत तीन अतिरिक्त सिम जोडण्याचा पर्याय दिला गेला आहे. त्यासाठी काही शुल्क आकारले जाते. तरीही या ऑफरमुळे कुटुंबातील सदस्य किंवा सहकाऱ्यांसोबत कनेक्ट राहणे सोपे होते. याचबरोबर या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ सिनेमा तसेच जिओ टीव्हीसारख्या लोकप्रिय सेवांचा फ्री अॅक्सेसही दिला जातो.
कमी दरात जास्त सुविधा देऊन ग्राहकांचा मोबाइल अनुभव अधिक समृद्ध करणे. रिलायन्स जिओच्या या योजना सध्या बाजारातील इतर टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धेत हिमतीने उभ्या आहेत आणि यूजर्सच्या गरजा आणि मनोरंजन दोन्ही लक्षात घेणाऱ्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.