Airtel Recharge Offer: एकदाच रिचार्ज करा, ३६५ दिवस फ्री! एअरटेलचे नवीन प्लॅन, किंमत किती?

Smart Recharge: एअरटेलने आणले दोन जबरदस्त एकवर्षीय प्लॅन! मिळणार अमर्यादित 5G डेटा, फ्री कॉलिंग आणि मोफत OTT सबस्क्रिप्शन. एकदाच रिचार्ज करा आणि 365 दिवसांचा टेन्शन-फ्री मोबाईल अनुभव घ्या.
Airtel Recharge Offer: एकदाच रिचार्ज करा, ३६५ दिवस फ्री! एअरटेलचे नवीन प्लॅन, किंमत किती?
Published On

भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन वार्षिक प्रीपेड प्लॅन ऑफर केले आहेत. ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास संपणार आहे. कंपनीचे हे दोन प्लॅन म्हणजे ₹३५९९ आणि ₹३९९९ चे आहेत. आणि दोन्ही प्लॅन ३६५ दिवसांची वैधता देतात. यामुळे एकदा रिचार्ज केल्यावर पूर्ण वर्षभर कॉल, डेटा आणि एसएमएसचा वापर कोणत्याही खंड न येता करता येतो.

₹३५९९ चा प्लॅन दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा देतो. त्यासोबतच अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल तसेच दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात. या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात स्वतंत्रपणे अमर्यादित ५जी डेटा दिला जातो. जो फक्त ५जी नेटवर्क उपलब्ध असलेल्या क्षेत्रांमध्ये वापरता येईल.

Airtel Recharge Offer: एकदाच रिचार्ज करा, ३६५ दिवस फ्री! एअरटेलचे नवीन प्लॅन, किंमत किती?
Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

याशिवाय या पॅकमध्ये एअरटेल स्पॅम वॉर्निंग सिस्टम, मोफत हेलोट्यून आणि तब्बल १७,००० रुपयांचे परप्लेक्सिटी प्रो एआय टूलचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. हा प्लॅन मुख्यतः अशा यूजर्ससाठी उपयुक्त आहे, ज्यांना फक्त कॉलिंग आणि आवश्यक इंटरनेट वापरासाठी योजना हवी आहे.

Airtel Recharge Offer: एकदाच रिचार्ज करा, ३६५ दिवस फ्री! एअरटेलचे नवीन प्लॅन, किंमत किती?
Budget Streaming: BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त प्लॅन, फक्त ₹३० मध्ये मिळवा OTT अ‍ॅक्सेस अन् मनोरंजनाची सुविधा

दुसरीकडे ₹३९९९ चा वार्षिक प्लॅन अधिक प्रीमियम स्वरूपाचा आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज २.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, १०० एसएमएस/दिवस, तसेच हॉटस्टार मोबाईलचे संपूर्ण १ वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यातही ५जी डेटा, स्पॅम अलर्ट, हेलोट्यून आणि परप्लेक्सिटी प्रो सारखी एआय सबस्क्रिप्शन सेवा दिली जाते. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी सर्वोत्तम आहे ज्यांना जास्त डेटा आणि OTT कंटेंटचा आनंद घ्यायचा आहे.

दोन्ही प्लॅन एक वर्षासाठी रिचार्ज-मुक्त अनुभव देतात. ज्यामुळे पैसे वाचतात आणि वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास दूर होतो. त्यामुळे जर तुम्ही साध्या वापरासाठी योजना शोधत असाल तर ₹३५९९ चा प्लॅन आदर्श ठरेल, तर डिजिटल एंटरटेनमेंट आणि जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी ₹३९९९ चा प्रीमियम प्लॅन अधिक योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com