व्हॉट्सअॅपने स्पॅम आणि प्रमोशनल मेसेजेसवर नियंत्रण आणण्यासाठी नवे फीचर तयार केले आहे. या फीचरद्वारे अनोळखी नंबर किंवा व्यवसायांकडून वारंवार येणाऱ्या, परंतु उत्तर न मिळालेल्या मेसेजेसवर मर्यादा घालण्यात येईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जाईल. सामान्य त्याचा यूजर्सवर परिणाम होणार नाही. पुढील काही आठवड्यांत हे फीचर विविध देशांमध्ये उपलब्ध होईल.
व्हॉट्सअॅपच्या चॅट लिस्टमध्ये सतत येणारे व्यवसायिक आणि प्रमोशनल मेसेजेसमुळे यूजर्सना महत्त्वाचे मेसेज शोधणे अवघड होते. अॅप आता कम्युनिटी, बिझनेस आणि ग्राहक सेवा यांसाठी वापरले जात असल्याने त्याचा वापर व्यापक झाला आहे. मात्र, त्यामुळे अज्ञात नंबरवरून येणाऱ्या सततच्या सूचना आणि मेसेजेसची समस्या वाढली आहे.
या समस्येवर उपाय म्हणून व्हॉट्सअॅप मासिक संदेश मर्यादा नावाचे नवीन फीचर चाचणी करत आहे. हे फीचर अशा व्यवसायिक यूजर्ससाठी आहे जे संपर्क सूचीबाहेरील लोकांना मेसेज पाठवतात. प्रतिसाद न देणाऱ्या व्यक्तींना पाठवलेले मेसेज त्या यूजर्सच्या मासिक मर्यादेत मोजले जातील.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉन्फरन्समध्ये भेटलात प्रतिसाद न मिळाल्यास तीन मेसेज पाठवले, तर ते तुमच्या एक महिन्याच्या मर्यादेतून कमी होतील. म्हणजेच, जर महिन्याची मर्यादा १० मेसेजची असेल, तर तुम्ही दरमहा फक्त १० संदेश पाठवू शकाल.
टेकक्रंचच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपने संदेश मर्यादेचा नेमका आकडा अद्याप जाहीर केलेला नाही, कारण विविध मर्यादांची चाचणी सुरू आहे. यूजर्स किंवा व्यवसाय मर्यादेजवळ पोहोचल्यास अॅप चेतावणी देईल, ज्यातून मर्यादेची स्थिती दिसेल. चेतावणीकडे दुर्लक्ष केल्यास नवीन लोकांना मेसेज पाठवण्यावर तात्पुरती बंदी लागू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.