Meat Ban Row in Maharashtra saam tv
महाराष्ट्र

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Meat Ban Row in Maharashtra : स्वातंत्र्यदिनीच मांस विक्री बंदीवरुन राजकारण तापलं... मात्र राज्यभरात कुठे आंदोलन तर कुठे चिकन आणि मटण बिर्याणीच्या पार्ट्या करुन मांस विक्री बंदीचा निषेध करण्यात आला.. पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

स्वातंत्र्यदिनीच हा आंदोलनाचा भडका उडालाय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात.... कारण महापालिकेन स्वातंत्र्यदिनाचा चिकन, मटण दुकान बंदीचा रद्द केला नाही. त्याविरोधात खाटिक समाजान आक्रमक आंदोलन करत महापालिका भवनासमोर कोंबड्या फेकत पालिकेच्या निर्णयाचा निषेध केलाय...

राज्यातील कल्याण डोंबवली, इचलकरंजी, मालेगाव, संभाजीनगर, नागपूर या महापालिकांनी स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते.. मात्र जनतेच्या रेट्यापुढे इचलकरंजी महापालिकेने मांस विक्री बंदीचा निर्णय मागे घेतला.. दुसरीकडे मटण प्रेमींच्या विरोधानंतरही कल्याण डोंबिवली महापालिकेने मात्र आडमुठेपणा करत आपला निर्णय कायम ठेवला.. त्यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केलाय...

महापालिकांच्या या तुघलकी निर्णयाविरोधात राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय..जितेंद्र आव्हाडांनी कल्याणमध्ये मटण पार्टीला हजेरी लावत देश हुकूमशाहीच्या दिशेने जात असल्याची टीका केलीय.. मांसविक्री बंदी विरोध प्रकरण फक्त कल्याण डोंबिवली पुरतं मर्यादित राहिलं नाहीय... तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मांस विक्री बंदीच्या आदेशाविरोधात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही बिर्याणी पार्टीचं आयोजन केलं..

खरंतर भारतीय राज्यघटनेनं कलम 21 नुसार व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिलाय.. ज्यामध्ये खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्याचा समावेश आहे.. मात्र स्वातंत्र्य दिनासाठी काढलेलं पालिकांचं फर्मान नागरिकांच्या मुलभूत अधिकारावरच घाला घालणारं आहे.. एकीकडे लोकांनी काय खावं यात सरकारला कुठलाच रस नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.. मात्र त्यानंतरही पालिका असं फर्मान काढत असतील तर त्यामागे नेमकं कारण काय ? आणि मांसबंदीचा हा निर्णय यावेळीच का ? असा प्रश्न निर्माण होतोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

Hair Care : सिल्की आणि शायनी केसांसाठी वापरा ही सोपी ट्रिक, हे आहेत घरगुती उपाय

Pune : मोठी बातमी! पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

SCROLL FOR NEXT