Maval News Saam Tv
महाराष्ट्र

Maval : कोट्यवधींचे तलाठी कार्यालय धुळ खातंय! खासगी ठिकाणीच महसूल कामकाज सुरू असल्याचा आरोप

Maval Vadgaon News : मावळ तालुक्यातील वडगाव येथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या तलाठी कार्यालय बंद अवस्थेत आढळलं आहे. महसूल कामकाज मात्र खाजगी ठिकाणी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Alisha Khedekar

कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले तलाठी कार्यालय बंद अवस्थेत

महसूल कामकाज खाजगी ठिकाणी चालल्याचा गंभीर आरोप

नागरिकांनस मूलभूत सेवा उपलब्ध नाहीत.

दोषींवर कारवाईची मागणी

दिलीप कांबळे, मावळ

मावळ तालुक्यातील वडगाव येथे कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज असे तलाठी कार्यालय उभारण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाने हे कार्यालय पूर्णपणे रिकामे असून नागरिकांना मूलभूत महसूल सेवांसाठी दारोदारी हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे तलाठी कार्यालय बंद असतानाही तलाठ्यांचा खाजगी दरबार मात्र वडगावच्या माळीनगर भागात दररोज भरत असल्याचा गंभीर प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते दत्ता काजळे यांनी उघडकीस आणला आहे.

राज्य शासनाचा स्पष्ट आदेश आहे की तलाठी, शिक्षक अथवा कोणताही सरकारी कर्मचारी ज्या गावात नेमणूक आहे, त्या गावातच वास्तव्यास असणे बंधनकारक आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत तलाठी अधिकारी एकाच ठिकाणी बसून काम करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना दाखले, जमिनीचे फेरफार, सातबारा, उत्पन्न प्रमाणपत्र यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तलाठी कार्यालय उघडे नसल्याने नागरिकांना वारंवार खाजगी ठिकाणी जावे लागत असून यात वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारी जागेऐवजी खाजगी ठिकाणी दरबार भरवणे म्हणजे भ्रष्टाचाराला थेट खतपाणी घालण्यासारखे प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

मावळ तालुक्यातील नागरिकांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.. कोट्यवधींच्या सरकारी इमारती धूळ खात असताना अधिकारी मात्र खाजगी ठिकाणी ‘सत्ता चालवत’ असल्याचे चित्र मावळमध्ये सध्या बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT