Jayant Patil Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil News : राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील लहान मुलगाही सांगेल; जयंत पाटील

maval News : राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोरगाही सांगेल; जयंत पाटील

दिलीप कांबळे

मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राष्ट्रवादी कोणाची हा वाद सुरु आहे. परंतु राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेल. त्यामुळे (NCP) राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे; असं मत प्रदेशाध्यक्ष (Jayant Patil) जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. (Breaking Marathi News)

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांनी भाजप- शिवसेना यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादी ही आमचीच असा दावा अजित पवार गटाने केला आहे. यामुळे सध्या कोर्टाकडून याबाबत निर्णय घेणार असून अजूनही वाद सुरु आहेत. दरम्यान राष्ट्रवादी ही शरद पवार यांचीच असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

निवडणूक आयोगाने यात बदल केला, तर महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, असं म्हणत त्यांनी केंद्रीय निवडणूक (Sharad Pawar) आयोगावर निशाण साधला. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. जयंत पाटील हे मावळमध्ये जनरल मोटरच्या कामगारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मावळचे आमदार सुनील शेळके हे सत्तेत जाऊन बसलेले आहे. इथे बोलण्यापेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांना चार खडे बोल सुनावले असते तर ही वेळ कामगारावर आली नसते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT