Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : वाहनांमधून ९५ म्हशीची कोंबून वाहतूक; चार गाड्या ताब्यात घेत दहा जणांवर गुन्हा दाखल

Maval News : पेठ वडगांव कोल्हापूर येथून मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाने चार वाहनातून ९५ जनावरे देवनार कत्तलखाना मुंबई येथे नेले जात होते

दिलीप कांबळे

मावळ : गुरांची अवैधपणे वाहतूक करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी समोर येत आहे. अशाच प्रकारे चार वाहनांमध्ये ९५ जनावरे कोंबून त्यांची वाहतूक केल्याचा प्रकार मावळच्या शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याबाबत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उर्से टोल नाक्याजवळ उघडकीस आली. 

पेठ वडगांव कोल्हापूर येथून मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाने चार वाहनातून ९५ जनावरे देवनार कत्तलखाना मुंबई येथे नेले जात होते. याबाबत (Police) पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांना खबर मिळताच सापळा रचून या गाड्या पकडल्या. यानंतर म्हशींना ताब्यात घेऊन संत तुकाराम गोशाळा धामणे (Maval) येथे सुरक्षित ठेवण्यात आल्या आहे. हा प्रकार उर्से टोल नाक्यावर उघडकीस आला.

दरम्यान म्हशींची वाहतूक करणाऱ्या १० जणांविरुद्ध शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींनी चार वाहनांमध्ये चारा पाण्याची सोय न करता ९५ म्हशी आणि रेडके कोंबली. जनावरांची वाहतूक करण्याबाबत आरोपींकडे कोणताही परवाना नव्हता. वाहतूक करताना जनावरांना दुखापत झाल्यास प्रथमोपचार करण्यासाठी साहित्य, औषधी देखील वाहनांमध्ये नव्हती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दहा जणांवर गुन्हा दाखल केला. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT