Rohit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar : दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

Maval News : सरकारने जाहीर केलेली मदत फसवी आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली म्हणणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात जाऊन पहावं अन कर्जमाफी जाहीर करावी. या मागणीसाठी रोहित पवार लाक्षणिक उपोषण करत आहेत

दिलीप कांबळे

मावळ : राज्यात महायुती सरकार आहे. परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला कुणकुण लागलेली आहे. दिल्लीतून आदेश आला असून भाजपने दोघांना सांगितलं आहे वेगळ लढा. भाजपची हि २०२९ ची तयारी सुरू आहे. तोपर्यंत दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. आता या सरकारला तुकोबांनी सद्बुद्धी द्यावी अन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. या मागणीसाठी देहूतील मंदिरासमोर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार लाक्षणिक उपोषणाला बसत आहेत. सरकारने जाहीर केलेली मदत फसवी आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली म्हणणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात जाऊन पहावं अन कर्जमाफी जाहीर करावी. या मागणीसाठी रोहित पवार लाक्षणिक उपोषण करत आहेत.

सरकारला गुडघ्यावर आणू 

शेतकऱ्यांप्रती सरकारने फसवी मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यांप्रती योग्य निर्णय घेतला जात नाही. सरकार झोपायचं सोंग घेत आहे. या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. लोकांच्या अडचणी मांडण आमचं काम करत आहोत. आमचा संघर्ष सुरूच राहील आणि सरकारला गुडघ्यावर आणू; असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे. 

संजय शिरसाट यांच्यावरही साधला निशाणा 
संजय शिरसाट काहीही म्हणतील. परंतु या सरकारने असले नग भरले आहेत. उपोषणकर्ता हा स्वतःसाठी उपोषण करत नाही. शिरसाट यांना सिडकोच्या जमिनी प्रकरणातील ५० हजार कोटी कुठं पचवायचे, यामुळे त्यांना उपोषण स्थळी जायला वेळ नसेल. तसेच सिडको संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना पुरावे दिलेत, तरीही हे सर्व गप्प आहेत. मुळात शिरसाट यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

पुण्यात गुंडगिरी आणि दादागिरी वाढली आहे. गरिबाला वाटत नाही की आपलं सरकार आहे. काही ठराविक व्यक्तीला हे सरकार आपलं आहे; असं वाटत आहे. सरकार ठोस आणि योग्य निर्णय घेत नसल्याने हे सर्व घडत आहे. पुणे महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि भ्रष्टचारसाठी एक नंबर असल्याचे देखील आमदार पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिवाळीत केलेल्या विद्युत रोषणाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झळाळला

Maharashtra Officer Promotion : राज्यात सनदी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; नरक चतुर्दशीच्या दिवशी कुणाची कुठे बढती झाली? जाणून घ्या

Maharashtra Government: महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी; 47 अधिकाऱ्यांना बढत्या

यांना मिरच्या का झोंबतात? नळबाजार, भिवंडीत जाऊन विचारा!; राज ठाकरेंनी बोगस मतदारांचा मुद्दा काढताच नितेश राणेंचं टीकास्त्र

Blood Sugar Level: अचानक ब्लड शुगर लेव्हल कमी झाली, कारण काय? आरोग्यावर काय होतो परिणाम

SCROLL FOR NEXT