Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval : युवकाने भावनिक व्हिडीओ करत पाठविला कुटुंबाला; नंतर संपविली जीवनयात्रा

Maval News : देहूरोडमध्ये कन्स्ट्रक्शन इमारतीवर कामाला होता. दरम्यान १७ जूनपासून तो बेपत्ता झालेला होता. त्याचा संपर्क न झाल्याने देहूरोड पोलीस स्टेशनला मिसिंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती

दिलीप कांबळे

मावळ : कुटुंबाला हातभार लागावा यासाठी पिंपरी चिंचवड परिसरात परराज्यातून एक युवक कामानिमित्ताने आला होता. मात्र नैराश्येतून या परप्रांतीय कामगार युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने व्हिडीओ करत कुटुंबाला पाठवला. यानंतर त्याने विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे. संजयकुमार हा पिंपरी- चिंचवडच्या काळेवाडी येथून देहूरोडमध्ये कन्स्ट्रक्शन इमारतीवर कामाला होता. दरम्यान १७ जूनपासून तो बेपत्ता झालेला होता. त्याचा कोणताही संपर्क न झाल्याने त्याबाबत देहूरोड पोलीस स्टेशनला संजयकुमार मिसिंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. 

ऑनलाईन मागविले विषारी द्रव्य 

दरम्यान देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने तांत्रिक तंत्रज्ञानच्या आधारे बेपत्ता तरुणाचा शोध लावला. मात्र पोलिसांच्या हाती त्याचा मृतदेह लागला. पोलिसांनी पंचनामा करताना मृतदेहा शेजारी एक विषारी द्रव्याची बाटली पोलीसांना सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस तपासात याने घेतलेलं विष हे ऑनलाईन मागवल्याचे तपासात समोर आले आहे.

कुटुंबाला पाठविला व्हिडीओ 
संजयकुमार या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडीओ केला आणि तो कुटुंबाला पाठविला होता. या व्हिडिओत त्याने म्हटले आहे, कि माझ्या आई वडिलांबद्दल मला आदर आहे. तर माझ्या दोन लहान बहिणींची मला खूप काळजी वाटते. त्यांचा सांभाळ नीट करावा, त्यानी शिकून मोठं व्हावे हीच माझी इच्छा. आत्महत्यापूर्वी या तरुणाची परीवारबद्दल तळमळ आत्मीयता दिसून आली. मात्र त्याने आत्महत्या का केली? याची माहिती गुलदस्त्यात राहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT