Sunil Shelke Saam tv
महाराष्ट्र

Sunil Shelke : दिवाळीतच मावळात महायुतीत पडणार ठिणगी; आमदार शेळकेंकडून पाडव्याला उमेदवार जाहीर करण्याचे संकेत

Maval News : राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कसा असावा यावरही आमदार शेळके यांनी प्रकाश टाकला. आपल्या भागातील सर्व माहिती जर त्या उमेदवाराला नसेल तर मीच त्याची तिकीट कापेल; असा सज्जन दम त्यांनी कार्यकर्त्यांना भरला

दिलीप कांबळे

मावळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल दिवाळी नंतर वाजणार आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवार निवडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान मावळात युती होओ की न होओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवाळी पाडव्याच्या दिवशी सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे दिवाळीतच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 

मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गावोगावी कार्यकर्ता संवाद यात्रेच्या निमित्ताने मावळचे आमदार सुनील शेळके आणि तालुक्याचे अध्यक्ष गणेश खांडगे सर्व तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केलेली आहे. या पार्श्वभूमीवर मावळातील एकही जागा महायुतीला देणार नाही. असे ठणकावून त्यांनी नाणे मावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता संवाद यात्रेत आमदार शेळके यांनी सांगितले आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांवरही साधला निशाणा 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कसा असावा यावरही आमदार शेळके यांनी प्रकाश टाकला. आपल्या भागातील सर्व माहिती जर त्या उमेदवाराला नसेल तर मीच त्याची तिकीट कापेल; असा सज्जन दम त्यांनी कार्यकर्त्यांना भरला. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तळेगाव नगरपरिषदमध्ये पाच वर्ष फिरकले नाही. ते आता म्हणायला लागले लागा तयारीला. आता थांबायचं नाही. आमचा दहा नंबर वार्ड फिक्स आहे. १२ व १३ नंबर फिक्स आहे. एवढ्या जर तुमच्या जागा फिक्स झाल्या आणि काम मात्र काहीच नाही. मी नगरपरिषद मध्ये जाऊन सांगणार आहे. जाच काम असेल तर याला निवडून द्या अन्यथा घरी बसवा. 

मावळातील एकही जागा मिळणार नाही 

दिवाळी पाडव्याच्या दिवशी तळेगाव, वडगाव, लोणावळा या मधली उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार. पाडव्यापर्यंत तुमचा आणि आमचा संबंध. नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाने जावे, आम्ही आमच्या मार्गाने जाणार. मात्र नाणे मावळतील जनतेला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसची एकही जागा मी दुसऱ्या पक्षाला देणार नाही. युती झाली नाही तरीही चालेल. पंचायत समितीला ही एकही जागा मी दुसऱ्या पक्षाला देणार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचा पहिला सभापती नानेमावळचाच होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विजय सत्याचाच होतो, असत्याचा नाही - पंतप्रधान मोदी

Pancreatic Cancer Symptoms: पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा अन् तुमचा जीव वाचवा

स्मृती मानधनाला पलाश धोका देतोय? लग्न पुढे ढकलण्याचे कारण काय? फ्लर्टी चॅट्स व्हायरल

Famous Director : प्रसिद्ध डायरेक्टरची मोठी गुंतवणूक; पॉश एरियात ५ प्रापर्टी केल्या खरेदी, किती कोटींमध्ये झाली डील?

PF चे पैसे ATM मधून काढता येणार; कधीपासून सुरु होणार EPFO 3.0? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT