Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval : शाळेला हक्काची इमारत नाही; कोटमवाडी गावातील वास्तव, एकाच खोलीत भरतात वर्ग

Maval News : गाव तिथे शाळा या युक्तीप्रमाणे २०१० साली कोटमवाडीमध्ये जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आली आहे. आज या शाळेत २८ विद्यार्थी शिक्षण घेत आहे

दिलीप कांबळे

मावळ : मावळच्या अतिशय दुर्गम भागात असलेले कोटमवाडी हे आदिवासी समाजाचं गाव आहे. येथील विद्यार्थ्यांना शिकण्याची जिद्द असल्याने हे विद्यार्थी अडीच किलोमीटर पायपीट करत शाळेत पोहचतात. मात्र शाळेची इमारत नाही. पायपीट करत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात ठीक आहे; मात्र पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांची अवस्था फारच बिकट होत असते. 

पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत मावळ तालुक्यातील पवनाधरणाच्या पायथ्याशी निसर्ग सौंदर्याने नटलेली कोटमवाडी आहे. कोटमवाडी संपूर्ण आदिवासी कातकरी समाजाने वसलेली वस्ती आहे. या ठिकाणी बेचाळीस कुटुंब राहतात. या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह निसर्गातील साधनसंपत्तीवर अवलंबून आहे. गाव तिथे शाळा या युक्तीप्रमाणे २०१० साली कोटमवाडीमध्ये जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आली आहे. आज या शाळेत २८ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तर शाळेत दोन शिक्षक आहेत. 

२०१० पासून शाळा तरी इमारत नाही 

शाळेत येणारी सर्व मुलं अभ्यासू, जिज्ञासू आणि शाळा प्रिय आहेत. नियमितपणे शाळेत येत, ज्ञानदानाचे धडे गिरवतात. मात्र या कोटमवाडीला पोहचायला मुख्य रस्त्यापासून सुमारे अडीच किमी कच्च्या रस्त्याने चिखल तुडवत पायपीट करत जावे लागते. वाडीतील शाळा २०१० पासून समाज मंदिरामध्ये भरत होती. शासनाकडून कोणत्याही पद्धतीची शाळा इमारत बांधली नाही. तरीही अठ्ठावीस विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तर २०२२ मध्ये महिंद्रा क्लबमार्फत शाळेस एक खोली बांधून देण्यात आली आहे. सध्या या खोलीमध्ये शाळा भरत आहे. परंतु ही खोली अपुरी आहे. 

बांधकामासाठी निधी मात्र जमीन नाही 

शाळेच्या नियमानुसार क्रीडांगणासह दोन वर्ग खोल्या असणे आवश्यक आहे. नियमाप्रमाणे जिल्हा परिषद पुणे यांचेकडून वर्ग खोली बांधकाम अनुदान ग्रामपंचायत चावसर यांच्याकडे चार वर्षापूर्वीच वर्ग केलेला आहे. मात्र कोटमवाडी हे शासकीय वन क्षेत्रात वसलेले आहे. त्यामुळे शाळेस खोल्या बांधकामास जमीन उपलब्ध होत नाही. मात्र यात विद्यार्थ्यांचा काय दोष. आम्हाला शहरातील मुलांप्रमाणे शिक्षण दिलं पाहिजे. शहरातील शाळांना सर्व मदत मिळते. मात्र ग्रामीण भागातील मुलांना किती कष्टमय जीवन जगून शिक्षण घ्यावं लागतं. दरम्यान कोटमवाडी गावातील सर्व पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक लवकरच शाळेस जागा उपलब्ध होईल याच्या प्रतिक्षेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT