Bhandara : ३६ विद्यार्थ्यांना परीक्षेपासून ठेवलं वंचित; उच्च माध्यमिक शाळेचे धक्कादायक कारण, मुख्याध्यापकाला नोटीस

Bhandara News : विद्यालयात अकरावी सायन्सला शिक्षण विभागाची अद्याप ग्रँड नाही. त्यामुळं येथे शिक्षण घेणाऱ्या ६० विद्यार्थ्यांकडून अकरावी आणि बारावी अशा दोन वर्गाचे एकूण १० हजार रुपये शाळा शुल्क घेतले
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: अकरावी विज्ञान शाखेला प्रवेशित ३६ विद्यार्थ्यांना वर्षाच्या अंतिम परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा प्रकार भंडारा येथील जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत समोर आला आहे. वर्षभरासाठी असलेली विद्यालयाची फि बाकी असल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नसल्याचे कारण देण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. 

भंडारा जिल्हा परिषदेची जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्सला शिक्षण विभागाची अद्याप ग्रँड मिळलेली नाही. त्यामुळं येथे शिक्षण घेणाऱ्या ६० विद्यार्थ्यांकडून अकरावी आणि बारावी अशा दोन वर्गाचे एकूण १० हजार रुपये शाळा शुल्क घेतले जाते. दरम्यान काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरलं नाही. तर काही विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपये शाळा शुल्क भरलेले आहे. 

Bhandara News
Sindhudurg : फणस काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हत्तीचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू

शिक्षकांचे वेतन थकल्याचे कारण 

असे असतानाही शाळेतील ३६ विद्यार्थ्यांनी शाळा शुल्क न भरल्याच्या कारणावरून आज विज्ञान शाखेच्या मराठी विषयाच्या पहिल्या पेपराला सदर विद्यार्थ्यांना बसू नं देता शाळेतून आल्यापावली परत पाठविण्यात आले. या ३६ विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. मुलांच्या शाळा शुल्कमधून त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे वेतन केले जाते आणि विद्यार्थ्यांकडून शुल्क न आल्याने शिक्षकांचे वेतन थांबल्याची बाब पुढे करून मुख्याध्यापक हटवार यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले आहे. 

Bhandara News
Pimpri Chinchwad : खिडकीचे पडदे काढताना विद्यार्थी खाली कोसळला; दोन्ही हात निकामी, पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील घटना

मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस 

मुळात मुलींना मोफत शिक्षण देण्यात येत असते. असे असताना देखील फी बाकी असल्याच्या कारणावरून परीक्षेला बसू दिले नाही. याची दखल घेत जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी तातडीने शाळेला भेट देत मुख्याध्यापक हटवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com