Sindhudurg : फणस काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हत्तीचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू

Sindhudurg News : दरम्यान सकाळी लक्ष्मण गवस हे त्यांची काजूची व फणसाची बाग असलेल्या परिसरात गेले होते. मोर्ले येथे आपल्या शेती बागायतीत काजू गोळा करण्यासाठी व फणस काढण्यासाठी एकटेच गेले होते
Sindhudurg News
Sindhudurg NewsSaam tv
Published On

विनायक वंजारे 
सिंधुदुर्ग
: सिंधुदुर्ग जिल्ह्यात फणसाची शेती केली जात असते. या दिवसात फणस काढणीला सुरवात करण्यात येत असते. त्यानुसार सकाळच्या सुमारास फणस काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर टस्कर हत्तींने मागून हल्ला केला. यात ७० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. घटनेनंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले परिसरात पहाटे सातच्या सुमारास हि घटना घडली आहे. यात लक्ष्मण गवस (वय ७०) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान सकाळी लक्ष्मण गवस हे त्यांची काजूची व फणसाची बाग असलेल्या परिसरात गेले होते. मोर्ले येथे आपल्या शेती बागायतीत काजू गोळा करण्यासाठी व फणस काढण्यासाठी एकटेच गेले होते. याच वेळी हत्तीने मागून हल्ला केला. 

Sindhudurg News
Bhandara : आईस्क्रीम खाताय तर सावधान; तुमसरात समोर आला धक्कादायक प्रकार, रिलायन्स मार्टमध्ये नवे स्टिकर लावून विक्री

हत्तीने हल्ला करत पायदळी चिरडले 

लक्ष्मण गवस यांच्यावर हत्तीने जीवघेणा हल्ला करत पायदळी चिरडले. यात त्यांच्या बरगड्या मोडल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून हत्तींचा हा जीवघेणा उपद्रव थांबविण्यात वन विभाग व राज्यकर्ते आता तरी डोळे उघडणार आहेत का? असा प्रश्न दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

Sindhudurg News
Ujani Dam : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; उजनीतून भीमा पात्रात सोडणार आवर्तन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

हत्ती पकडण्याची मागणी 
घटनेनंतर वनक्षेत्रपाल मंडल वनपाल किशोर जंगले व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घटनेनंतर तरी हत्तीना तिलारी खोऱ्यात स्थिरावण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनी हत्ती पकड मोहीम राबवून शेतकऱ्यावरील संकट दुर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com