शुभम देशमुख
भंडारा : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने आईस्क्रीची मागणी देखील वाढली आहे. यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे आईस्क्रीमची फॅमिली पॅक असून यासाठी विशिष्ट मुदत देण्यात आलेली असते. मात्र रिलायन्स मार्टमधून एक्सपायरी डेट संपलेलय आईस्क्रीमची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे एक्सपायरी स्टिकरवर नवीन स्टिकर चिपकवून आईस्क्रीम विक्रीसाठी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्याच्या तुमसरात उघडकीस आला आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून अनेक जण आता आईस्क्रीम खाण्यावर जोर देत आहेत. परिणामी आईस्क्रीमची मोठ्या प्रमाणात मागणी देखील वाढली आहे. ठिकठिकाणी आईस्क्रीमची स्टॉल, दुकाने लावण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कंपन्या यात असून याच्या पॅकिंगवर निर्मित व मुदत संपण्याची तारीख यावर छापण्यात आलेली असते. असे असले तरी मुदत संपलेले आईस्क्रीम विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मॉलमध्ये एक्सपायरी झालेली आईस्क्रीम
भंडाऱ्याच्या तुमसर येथील अभिषेक भुरे हा तरुण तुमसर शहरात असलेल्या रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये आईस्क्रीम खरेदी करायला गेला होता. यावेळी त्याला एक्सपायरी झालेली आईस्क्रीम विकत देण्याचा प्रयत्न मॉलमधील कर्मचाऱ्यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला. दिनशाज कंपनीची संत्रा बर्फी फ्लेवरची आईस्क्रीमची मागणी केली. त्याला त्या आईस्क्रीमचा बॉक्स देण्यात आला, त्या बॉक्सवर एकावर एक दोन स्टिकर लावल्याच्या आढळून आले.
मुदत संपल्याने नवीन स्टिकर
वरचा स्टिकर काढला असता खालील स्टिकरवर आईस्क्रीमची मॅन्युफॅक्चरिंग तारीख निघून गेल्याने ती एक्सपायरी झाल्याचं लक्षात आले. त्या एक्सपायरी झालेल्या तारखेवर नवीन स्टीकर लावून तो विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता आईस्क्रीम खाणाऱ्यांनी सावधानगिरी बाळगून आईस्क्रीम खरेदी करण्याचा आणि स्वतःच्या जीवनाची काळजी घेण्याची गरज असल्याचे चित्र भंडाऱ्याच्या तुमसरात समोर आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.