Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : अवजड वाहनांची वाहतूक बंदीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; तळेगाव एमआयडीसीकडे जाणारा रस्ता रोखला

Maval News : आंबी ते मंगरूळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले जाते. अवजड वाहने रस्त्यावरून जात असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे

दिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसीमधील आंबी ते मंगरूळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले जाते. यामुळे हा रस्ता सामान्य नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या विरोधात आज तळेगाव येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. तर तळेगाव एमआयडीसीकडे जाणारा रस्ता रोखला. 

आंबी ते मंगरूळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात (Maval) गौण खनिज उत्खनन केले जाते. अवजड वाहने रस्त्यावरून जात असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी व सामान्य नागरिक प्रवास करत असतात. मात्र सतत या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच या रस्त्यावरून गौण खनिज वाहतूक करणारी अवजड वाहने जात असतात. त्यामुळे हा रस्ता खराब झाला असून सात लोकांचा बळी या रस्त्याने घेतला. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. 

रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनावर ठाम 

गौण खनिज उत्खनन व्यावसायिकांना स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली. तरी देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी (Rasta Roko) रास्ता रोको करत आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत रस्ता दुरुस्ती करून दिली जात नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT