Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : रस्त्यावर मांडला संसार; रस्ता नसल्याने २३ कुटुंबांचे बेमुदत उपोषण

maval News : मागील तीस वर्षापासून या भागात राहत असताना पिंपरी- चिंचवड महापालिकेने अद्यापही या ३०० ते ४०० कुटुंब असलेल्या वस्तीला रस्ता दिला नाही.

दिलीप कांबळे


मावळ : परिसरात जाण्यासाठी रस्ता नाही. तीस वर्ष झाले रहिवास असताना देखील रस्ता होत नसल्याने देहूरोडच्या किवळे येथील सर्व्हे क्रमांक ७५ माळवाले नगर परिसरात असलेल्या २३ कुटुंब बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी मुकाई चौकात बसले आहेत. कुटुंबातील लहान मुले देखील आंदोलनासाठी बसले आहेत. 

मागील तीस वर्षापासून या भागात राहत असताना (Pimpri Chinchwad) पिंपरी- चिंचवड महापालिकेने अद्यापही या ३०० ते ४०० कुटुंब असलेल्या वस्तीला रस्ता दिला नाही. त्यामुळे पालिका प्रशासन तसेच स्थानिक जमीन मालक यांच्या विरोधात हे धरणे आंदोलन करण्यात आले असून सर्व कुटुंब रस्त्यावर आपला संसार थाटून मुलाबाळांसह बसले आहेत. किवळे गावातील शेतकरी मूळ जमीन मालक रामचंद्र तरस यांच्याकडून या २३ कुटुंबाने गुंठेवारी पद्धतीने जमिनी विकत घेतल्या होत्या. मात्र तेव्हा लोकवस्ती वाढली नव्हती. रस्ता मुबलक होता. परंतु कालांतराने जमिनीचे भाव वाढले आणि येथील राहिवाश्यांचे रस्त्यासाठी हाल होऊ लागले.  

याबाबत पिंपरी पालिकेशी पत्रव्यवहार ही करण्यात आला. मात्र काहीच उपयोग नाही झाला. चिंचवडचे आमदार, मावळ खासदार मत मागायला आले. आम्हाला निवडून द्या तुमचा रस्ता करतो. मात्र निवडणूक होताच सर्वांनी पाठ फिरवली. अखेर येथील परिवाराला आज १० फूट रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गणली जाणारी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका या २३ कुटुंबांना रस्ता देईल का? तेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे स्थानिक जमीन मालक शेतकरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ही जमीन आमच्या खासगी मालकीची आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याना दहा फुटी रस्ता करून द्यावा. तो पालिकेचा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, याचा गैरसमज आम्ही #@$ डू नाही - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT