Maval Crime Saam News
महाराष्ट्र

Maval Crime : रात्री फोन करून भेटायला बोलावत केली हत्या; मोकळ्या मैदानात नेत केले सपासप वार, मुलाचा मृत्यू, चुलत भावावरही केला वार 

Maval News : मावळच्या देहूरोड येथील थॉमस कॉलनी येथे राहणारा दिलीप शुगर मोर्या (वय १७) असे घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या घटनेत त्याचा पंधरा वर्षीय चुलत भाऊ जखमी झाला आहे

दिलीप कांबळे

मावळ : मावळच्या देहुरोड परिसरात रात्रीच्या सुमारास भयानक घटना घडली आहे. मित्राचा फोन आल्याने भेटण्यासाठी गेला. मात्र या ठिकाणी गेल्यावर झालेल्या वादातून शास्त्राने सपासप वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर शोध घेण्यासाठी गेलेल्या चुलत भावावर देखील वार करत जखमी केले आहे. सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

मावळच्या देहूरोड येथील थॉमस कॉलनी येथे राहणारा दिलीप शुगर मोर्या (वय १७) असे घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या घटनेत त्याचा पंधरा वर्षीय चुलत भाऊ जखमी झाला आहे. दरम्यान मयत दिलीप हा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असून वडिलांना बेकरी व्यवसायास मदत करीत होता. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यास त्याच्या ओळखीच्या व्यक्तीने फोन करून शितळानगर येथील गार्डनजवळ बोलविले. त्यानंतर त्याला शितळा नगर येथून साईनगर येथे जाणाऱ्या मोकळ्या मैदानात नेले. 

चुलत भावालाही केले जखमी 

दरम्यान दिलीप तसेच मारेकरी यांच्यात वाद झाल्याने मारेकऱ्याने त्याच्या जवळ असलेल्या धारधार चाकुने दिलीपच्या गळ्यावर, डोक्यात व इतर ठिकाणी वार केले. याच वेळी चूलत भावाला शोधण्यासाठी आलेल्या मृत दिलीपचा चुलत भाऊ घटनास्थळा वर पोहचला. घडलेला प्रकार त्याने पाहिला असता हल्लेखोराने त्याच्याही पोटात चाकूने हल्ला केला. मात्र आपला जीव वाचवत जखमी अरुण मोर्या हा तेथून पळून गेला. त्याने घडला प्रकार आपल्या मित्र, नातेवाईक व पोलिसांना सांगितलं. तर देहुरोड पोलीसांचे एक पथक रात्रभर बैपत्ता दिलीप याचा शोध घेत होते. 

पहाटे चार वाजता आढळला मृतदेह 

दरम्यान पहाटे चार वाजताच्या सुमारास दिलीप याचा मृतदेह शितळा नगर कडून साईनगर कडे जाणऱ्या कच्या रस्तावर अढळून आला. घटना स्थळावरून पोलीसांनी एक मोबाईल, चाकू हस्तगत केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीसांनी एक पथक रवाना केले आहे. तर मयत याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT