MHADA : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे कुलूप तोडून घुसखोरी; अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना चौघेजण ताब्यात

Mumbai News : कुलाबा कफ परेड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात म्हाडाचे ट्रान्झिस्ट कॅम्पची इमारत आहे. या इमारतीत उपकर प्राप्त परंतु धोकादायक इमारतीतील रहिवाशांना पर्यायी जागा म्हणून घरे दिली जातात
Mumbai News
Mumbai NewsSaam tv
Published On

संजय गडदे
मुंबई
: म्हाडाच्या कुलाबा येथील संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे टाळे तोडून गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्या चार जणांच्या टोळक्याला कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. म्हाडा संक्रमण शिबिरात मागील अनेक दिवसांपासून गाळ्यांचे टाळे तोडून अवैध घुसखोरी करून अमली पदार्थ विक्री करत असल्याबाबतचे तक्रार नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे. 

कफ परेड पोलिसांनी विवेक खेमू राठोड, महेंद्र शिवनाथ चव्हाण, राहुल रेड्डी चव्हाण आणि रोशन मेघनाथ जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे चारही जण कुलाबा परिसरात राहणारे आहेत. मुंबईच्या कुलाबा कफ परेड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात म्हाडाचे ट्रान्झिस्ट कॅम्प म्हणजेच संक्रमण शिबिराची इमारत आहेत. या इमारतीत उपकर प्राप्त परंतु धोकादायक इमारतीतील रहिवाशांना पर्यायी जागा म्हणून घरे दिली जातात.

Mumbai News
Ratnagiri : घरात एकट्या असलेल्या मुलीसोबत घडले भयंकर; कुटुंबीय घरी आल्यानंतर हादरले

सुरक्षा रक्षक असताना घुसखोरी  

सध्या या ठिकाणी म्हाडाकडून काही रहिवाशांना घरे देखील देण्यात आली आहेत. मात्र काही घरांना टाळे मारून ठेवले आहेत. इथे कोणी घुसखोरी करू नये; यासाठी म्हाडाकडून सुरक्षा रक्षक देखील नेमण्यात आले आहेत. मात्र सुरक्षा रक्षक असताना संक्रमण शिबिरातील अनेक गाळ्यांचे टाळे तोडून इथे गांजा आणि एमडी असे अमली पदार्थ विकणाऱ्या आणि त्याचं सेवन करणाऱ्या काही तस्करांकडून घुसखोरी करण्यात आली. यासंदर्भात रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली.

Mumbai News
Risod News : वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा; घराचं छत पडून कुटुंब दबले, दोनजण जखमी

पोलिसांनी धाड टाकत कारवाई 
रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेत कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानुसार काल सकाळी त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता चार तरुण गांजा पीत असताना आढळून आले. पोलिसांनी सर्व नशेखरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सध्या चारही आरोपी कफ परेड पोलिसांच्या ताब्यात असून ते अमली पदार्थ कुणाकडून आणत होते याबाबतचा कसून शोध घेत आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष 
म्हाडाकडून या ठिकाणी उपकर प्राप्त इमारतीतील आणि दुर्घटना झालेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी गाळे निर्माण केले आहेत. मात्र प्रत्यक्षात अशा लोकांना गाळे वितरित न करता ते अशा प्रकारे घुसखोरांकडून बळजबरीने हडप केले जात आहेत. या गाळ्यांकडे म्हाडाचे दुर्लक्ष आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच म्हाडा संक्रमण शिबिरात सुरक्षारक्षक असताना इथे घुसखोरी कशी झाली याबाबत म्हाडा अजूनही अंधारात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com