Risod News : वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा; घराचं छत पडून कुटुंब दबले, दोनजण जखमी

Washim News : रिसोड तालुक्यातील वादळी वाऱ्याने आसेगाव पेन, बेलखेडा, व्याड या परिसरातील अनेक घरांची टिनपत्रे उडून नुकसान झाल आहे. अनेक कुटुंब उघड्यावर पडले. छताखाली कुटुंब दाबले गेल्याने दोन जण जखमी
Risod News
Risod NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: राज्यातील अनेक भागात बुधवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला आहे. तर वाशिमच्या रिसोड तालुक्यात देखील वादळी वाऱ्याचा मोठ तांडव बघायला मिळाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छतं उडून गेली असून, मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंबाच नुकसान झाले. आसेगाव पेन येथील चव्हाण कुटुंबावर घराचे संपूर्ण छत कोसळून पडल्यानं अख्ख कुटुंब या छताखाली दबलं होतं. यात दोन जण जखमी सुद्धा झाले आहेत.

राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाले आहे. त्यानुसार वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वादळी वाऱ्याने आसेगाव पेन, बेलखेडा, व्याड या परिसरातील अनेक घरांची टिनपत्रे उडून नुकसान झाल आहे. अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहे. छताखाली कुटुंब दाबले गेल्याने दोन जण जखमी झाले आहेत. 

Risod News
Sangli BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूका स्वबळावर; भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत कार्यकर्ते आग्रही

वीज पडून गोठ्याला लागली आग 
जांब आढाव गावात काल सायंकाळी विष्णू भानुदास जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर विज कोसळून गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये गोठ्यात ठेवलेले कृषी पंप, पाईप, केबल आणि जनावरांचा चारा जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. आज सकाळी प्रशासनाकडून अनेक घरांचे पंचनामे सुद्धा करण्यात आले आहेत. यावर आता प्रशासन काय मदत करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Risod News
Ratnagiri : घरात एकट्या असलेल्या मुलीसोबत घडले भयंकर; कुटुंबीय घरी आल्यानंतर हादरले

जळगावला वादळी पावसाने झोडपले
जळगाव
: जळगाव शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी पावणे आठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा आणि पावसाच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे व वादळामुळे शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली. तर काही भागात वीज खांब वाकले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com