Solapur Akkalkot MIDC Fire Saam TV
महाराष्ट्र

Solapur News : सोलापूर एमआयडीसी परिसरातील रबर फॅक्टरीला भीषण आग; अग्निशमन दलाचे ५० बंब घटनास्थळी

सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका रबर गारमेंट फॅक्टरीला मोठी आग लागली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur MIDC Fire : सोलापूर जिल्ह्यातून भीषण आगीची घटना समोर आली आहे. सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका रबर गारमेंट फॅक्टरीला मोठी आग लागली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली असून आगीने रौद्ररुप धारण केलं आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे ५० हून अधिक बंब दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे काळे लोट पसरले आहे.

अजूनही ही आग आटोक्यात आली नसल्याची माहिती आहे. नेमकी आग कशामुळे लागली? याचे कारण अजूनही समोर आलेलं नाही. रबर फॅक्टरीला आग लागल्यानंतर आसपासच्या गारमेंट कारखान्यांनाही आगीने घेरले. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहापर्यंत धुमसत होती. (Latest Marathi News)

दरम्यान, आगीची माहिती मिळताच, सोलापूर (Solapur) महापालिका, तसेच एमआयडीसी, एनटीपिसी, अक्कलकोट शहर, बार्शी येथून अग्निशमन दलाचे ४० ते ५० बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही.

या भीषण आगीमुळे परिसरातील इतर कारखानदार हवालदिल झाले. मिळेल ते साहित्य हलवण्यासाठी कारखानदारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी सोलापूर शहर पोलीस फौज फाटा तळ ठोकून आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र, कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र वेतन नियम 2026 लागू, 8 तास काम दुप्पट ओव्हर टाईम

एजंटकडून कर्जवसुलीसाठी रुग्णालयातच छळ, बँक कर्मचाऱ्याची शेतकरी महिलेवर मुजोरी; पोलीस आणि वसुली एजंटचं साटंलोटं?

डिलिमिटेशनला पवार-स्टॅलिन अनुकूल? सशर्त अटींसह पाठिंबा देण्याचे संकेत

2035 पर्यंत इस्लाम जगातला सर्वात मोठा धर्म; भारतात 2070 मध्ये 33 कोटी मुस्लीम?

'ऑपरेशन टायगर'आधी भाजपचं 'ऑपरेशन लोटस'! शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोठं खिंडार

SCROLL FOR NEXT