छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरामध्ये असलेल्या आमदार प्रदीप जयस्वाल यांची हॉटेल ग्रँड सरोवरला आग लागल्याची घटना घडली. रात्री ८.०५ वाजता आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये हॉटेलचा काही भाग जळून खाक झालाय. आग इतकी भीषण होती की, काही मिनिटाताच आगीने हॉटेलच्या सगळ्याच भागांना विळखा घातला. मात्र अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर हॉटेलची आग आटोक्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आग सुरुवातीला पूर्वेकडील किचनच्या बाजूला लागली होती. वारे जास्त असल्याने आग वाढू लागली आणि हॉटेलच्या पश्चिमेकडच्या बाजूचा भाग आपल्या विळख्यात घेतलं. त्यामुळे हॉटेलचे तीन फ्लोर हे आगीच्या भक्षस्थानी पडले. तातडीने वाळूज एमआयडीसी, नक्षत्रवाडी, कांचनवाडी आणि सिडकोतील अग्निशन दलाच्या टीमने आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवलं.
यामुळे मोठा अनर्थ टळला. ज्या बाजूला आग लागली होती. त्या बाजूला असलेल्या गेस्ट हॉस्टेलमध्ये कोणीही नव्हता. दुसऱ्या बाजूला असलेले लोकांना तातडीने खाली उतरवण्यात आले. या आगीत हॉटेलचं मोठ नुकसान झालंय.
ग्रँड सरोवर हॉटेल आमदाराची मालकीची आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूजमध्ये ही हॉटेल आहे. शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीची हॉटेल असल्याची माहिती हाती आली आहे. प्रदीप जयस्वाल हे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे आमदार आहेत. प्रदीप जयस्वाल यांनी वयाच्या २५ व्या वर्षापासून शिवसेनेत काम सुरू केले. त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक आणि महापौर म्हणून काम केले आहे.
खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण केलाय. दरम्यान २००४ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस नेते आणि माजी राज्य शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर शिवसेना आणि प्रदीप जयस्वाल यांच्यात दुरावा निर्माण झाला. आपल्या पराभवात शिवसेनेतील काही नेत्यांनीच राजेंद्र दर्डा यांना मदत केल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला होता.
त्यामुळेच २००९ मध्ये त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारण्यात आले होते. तेव्हा ते ठाकरे गटात होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला होता, त्यावेळी जयस्वाल यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.