Tahawwur Rana: हाच तो! १६६जणांचा जीव घेणारा तहव्वूर राणा; २६/११चा हल्ल्यामागील मास्टरमाईंचा पहिला फोटो व्हायरल

Tahawwur Rana Extradition: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांना दिल्लीला आणण्यात आले.

पांढरे केस, वाढलेली पांढरी दाढी, अंगावर तपकिरी रंगाचे कपडे घातलेला हाच तो दहशतवादी. हाच तो दहशतवादी ज्याने मुंबईत २६/११चा हल्ला घडवला आणि १६६ जणांचा जीव घेतला. हाच तो हैवान तहव्वूर राणा. २६/११चा मुंबई हल्ल्यामागचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज भारतात फरफटत आणण्यात आले. एनआयएच्या विशेष पथकाने एका विशेष विमाने त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. याचदरम्यान तहव्वूर राणा पहिला फोटो समोर आलाय. त्याला एनआयएच्या पथकाने अटक केलीय. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सांगितले की, पाकिस्तानी वंशाचे ६४ वर्षीय कॅनेडियन नागरिक राणाला गुरुवारी संध्याकाळी एका खास विमानाने दिल्लीला आणण्यात आलं.

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे. सीआयएसएफ व्यतिरिक्त इतर निमलष्करी दलांचे जवानही न्यायालयाबाहेर तैनात करण्यात आले आहेत. दहशतवादीचा पहिला फोटो व्हायरल झालाय, या फोटोमध्ये त्याची दाढी वाढलीय. डोक्यावरचे केस पांढरे झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com