wardha news, massive fire at dhanodi bahaddarpur near wardha  saam tv
महाराष्ट्र

Dhanodi Bahaddarpur Fire News : धानोडी बहाद्दरपुरात भीषण आग, सिंचनाचे काेट्यावधीचे साहित्य जळाले

घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले आहे.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील धानोडी बहाद्दरपुर (dhanodi bahaddarpur) येथे भीषण आग लागली आहे. धानोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पतून उपसा सिंचनाचे काम सुरु आहे. त्या घटनास्थळी आग लागल्याने काेट्यावधींचे साहित्य जळून खाक झाले आहे. (Maharashtra News)

विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत हे काम सुरु आहे. आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना ड्रीप लाऊन मोफत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. जैन एरिगेशनने कामासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवले हाेते.

घटनास्थळी शॉट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक झाले आहे. आगीचे आकाशात मोठ्या प्रमाणात लोळ दिसत आहे. घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले असून आग विजविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत काेट्यावधीचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई

Politics: महायुतीत धुसफूस! भाजपकडून शिंदेंच्या नेत्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; फोडाफोडीचं राजकारण सुरू

Operation Mahadev : ऑपरेशन महादेव हे नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shani Shingnapur News : शनी शिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्तांची आत्महत्या; पोलिसांनी केला मोठा खुलासा

Death : शटलकॉक घ्यायला गेला अन् खाली कोसळला, बॅडमिंटन खेळताना २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT