Palghar Fire News  Saam tv
महाराष्ट्र

Palghar Fire Video : पालघरमध्ये कंपनीला भीषण आग; धुराचे लोळ पाहून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट

पालघरच्या पूर्वेस असलेल्या नंडोरे औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Palghar fire News : पालघरमधून एका कंपनीला आग लागल्याचं वृत्त हाती आलं आहे. पालघरच्या पूर्वेस असलेल्या नंडोरे औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एक खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन वाहने दाखल झाल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या (Palghar) पूर्व भागात असेलेल्य नंडोरे औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी ही घटना घडली आहे. पालघरमधील आनंद इंजिनिअरिंग या कंपनीला भीषण आग (Fire) लागली आहे. आग लागल्याने परिसरात उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती कळविली. त्यानंतर आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यामुळे परिसरात हवेत धुराचे लोळ पसरले आहेत. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

पालघर पूर्वेस असलेल्या नंडोरे देवखोप येथील आनंद इंजीनियरिंग या कंपनीला दुपारी दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. तसंच याच कंपनीच्या शेजारी असलेल्या एच बी फुड्स अँड डेअरी कॉर्पोरेशन ही कंपनी देखील आगीच्या भक्षस्थानी आल्याने जळून खाक झाली आहे.

आनंद इंजीनिअरिंग या कंपनीत स्प्रे तयार होत असून शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. या आगीत दोन्ही कंपन्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पालघर नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Secret Santa Gifts : 'सीक्रेट सांता'मध्ये काय गिफ्ट द्या? वाचा '10' युनिक गिफ्ट आयडिया, मैत्रिणी होतील खुश

पुणेकरांचा काही नेम नाही! पाईपलाईन फुटली कार धुतली|VIDEO

Maharashtra Politics: सांगलीनंतर पुण्यात अजित पवारांचा भाजपला दे धक्का, बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Live News Update: सावकाराच्या कर्जापायी किडनी विक्री प्रकरणात कठोर कार्यवाही होणार - चंद्रशेखर बावनकुळे

National Herald Case : सोनिया-राहुल गांधींना दिलासा; सत्याचा विजय झाल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT