Palghar News Saam Tv
महाराष्ट्र

Land Scam News : अबब! पालघरमध्ये कोट्यवधींचा जमीन घोटाळा; ५५ एकर जागेमुळं पर्दाफाश

Palghar news : पालघरच्या तलासरी येथे काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्थेची 55 एकर जमीन केवळ 70 लाखांत विक्री झाल्याचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. ऑडिटमध्ये घोटाळा उघड झाल्याने सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • 55 एकर जमीन कवडीमोल दरात विक्री

  • संस्थाचालकांनीच स्वतः जमीन विकल्याचा आरोप

  • ऑडिटमध्ये व्यवहारात घोटाळ्याचे पुरावे

  • 6 आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • कारवाई न झाल्यास मनसेचे आंदोलन होणार

रुपेश पाटील, पालघर

पालघर मध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा समोर आला आहे . पालघरच्या तलासरी येथील काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्था मर्यादित संस्थेची मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असलेली 55 एकर जमीन संस्था संचालकांसह तत्कालीन सहाय्यक निबंधक असलेल्या अधिकाऱ्याने कवडीमोल दराने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

2022 साली या 55 एकर जमिनीची किंमत शासकीय किमती नुसार सात कोटी रुपये असताना देखील या संस्थाचालक आणि सहाय्यक निबंधकाने केवळ 70 लाखांना या जमिनीची विक्री केली . विशेष म्हणजे या जमिनीची किंमत 2022 साली साधारणतः सात कोटी असली तरी आता या जमिनीची किंमत ही शेकडो कोटींच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय .

तलासरीच्या काजळी येथे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था निर्माण करण्यात आली होती . या संस्थेसाठी 55 एकर जमीन देण्यात आली असून 2022 साली या जमिनीची संस्था संचालक आणि या संस्थेवर नियंत्रण असलेल्या सहाय्यक निबंधका मार्फत केवळ 70 लाखांना विक्री करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे खरेदी करणारे मालक या संस्था संचालकांमधूनच काहीजण असून हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एका लेखापरीक्षकामार्फत या संस्थेच आणि जमिनीच ऑडिट करण्यात आलं . या ऑडिटमध्ये या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच निष्पन्न झाले. त्यानंतर सध्याचे सहाय्यक निबंधक तसेच ऑडिटर यांच्यामार्फत तत्कालीन संस्थाचालकांसह तत्कालीन सहाय्यक निबंधक अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पालघर पोलिसांना पत्र देण्यात आल आहे . याबाबत लवकरच गुन्हा दाखल न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेचे तालुका प्रमुख विजय वाडिया यांच्या कडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT