Palghar Boisar Tarapur MIDC Blast Saam TV
महाराष्ट्र

Breaking News: बोईसर-तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात भीषण स्फोट; परिसरात धुराचे लोट, पाहा VIDEO

Palghar Breaking News: पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील मोल्टास कारखान्यात शनिवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला.

Satish Daud

Palghar Boisar Tarapur MIDC Blast

पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील मोल्टास कारखान्यात शनिवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण परिसराला हादरले बसले. या स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली. आग लागल्याचं कळताच कारखान्यातील कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत मोल्टास हा कारखाना आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास या कारखान्यात काही कामगार काम करीत होते. त्याचवेळी अचानक भीषण स्फोट होऊन कारखान्याला मोठी आग लागली.

ही आग इतकी भीषण होती, की आगीचे आणि धुराचे लोळ लांबच लांब पसरले. दरम्यान, आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांनी वेळीच बाहेर धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. धुराचे लोट पाहून अनेकांनी परिसरातून पळ काढला.

दरम्यान, स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT