आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाला सुरूवात केली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. राज्यात अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी देखील एसटी बससेवा ठप्प आहेत. दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर मराठा आंदोलकांनी महामार्ग रोखला आहे. त्यामुळे मोठी वाहतुककोंडी झाली आहे. मात्र आंदोलकांनी माणुसकीचं दर्शन घडवत वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे आंदोलकांचं कौतुक होत आहे.
पुणे नाशिक महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठबळ मिळावं यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महामार्गावर एक तासांपासून मोठी वाहतुककोंडी निर्माण झाली आहे. यावेळी मनोज जरांगेपाटलांच्या आव्हानाचे स्वागत करून आंदोलनातून आंदोलकांनी माघार घेत थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला येताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा, अन्यथा मराठा समाज्याच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज (शनिवार) बीड जिल्ह्यात आणि तालुक्यातील गावा गावांत मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. (Maharashtra News)
बीडच्या घाटसावळी आणि पिंपळनेरमध्ये गावामध्ये मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बीडच्या घाटसावळीमध्ये गावातून जाणारा बीड -परळी महामार्ग (beed parli highway) आंदाेलकांना राेखला. पिंपळनेर गाव बंदची घोषणा मराठा बांधवांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.