Maratha Reservation:मराठा आंदोलकांनी कार फोडल्यानंतर काँग्रेस आमदाराची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आता घरच्या माणसाला..."

MLA Mohan Humbarde : आरक्षणासाठी मराठा समाज आता घरच्या माणसाला देखील सोडत नाही. मी घरचा माणूस आहे , तरीही रागातून माझी गाडी फोडली. यावरून सरकारने समजून घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया काँगेसचे नांदेड येथील आमदार मोहन हंबर्डे यांनी दिली आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam Digital
Published On

Maratha Reservation

आरक्षणासाठी मराठा समाज आता घरच्या माणसाला देखील सोडत नाही. मी घरचा माणूस आहे , तरीही रागातून माझी गाडी फोडली. यावरून सरकारने समजून घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया काँगेसचे नांदेड येथील आमदार मोहन हंबर्डे यांनी दिली आहे. काल (शुक्रवार) रात्री मोहन हंबर्डे हे मतदार संघातील पुंड पिंपळगाव येथे कीर्तनासाठी गेले होते. तेव्हा मराठा तरुणांनी त्यांची गाडी फोडली. दरम्यान गाडी फोडल्याचा मला राग होता. पण त्यांची मागणी रास्त आणि न्यायिक असल्याने मी पोलिसात तक्रार केली नाही. मराठा समाज आता घरच्या माणसाला देखील सोडत नाही. माझी गाडी फोडली यावरून सरकारने समजून घ्यायला पाहिजे असं मोहन हंबर्डे म्हणाले आहेत.

गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळत आहे. नांदेडमधील पिंपळगाव निमजीमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. राज्य सरकारही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. या अधिवेशनाआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत.सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केलं आहे. याच मागणीसाठी बुधवारी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Akola News: अकोल्यात कुख्यात गुंड १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध, दोघांवर तडीपारची कारवाई; पोलिसांची धडक कारवाई

राज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी या भागात ही घटना घडली होती. आमदार मोहन हंबर्डे हे या भागात किर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. याचवेळी मराठा आंदोलकांनी आमदार हंबर्डे यांची कार फोडली. या घटनेत आमदार मोहन हंबर्डे थोडक्यात बचावले होते.

Maratha Reservation
Manoj Jaranage Patil: आतापर्यंत झालं नाही, त्याहूनही मोठं आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com