Akola News: अकोल्यात कुख्यात गुंड १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध, दोघांवर तडीपारची कारवाई; पोलिसांची धडक कारवाई

Akola latest News: अकोला पोलिसांचा प्रतिबंधक कारवाईवर चांगलाचं जोर वाढत आहे. आता थेट सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी तुरुंगाचा मार्ग दाखविला जात आहे.
Akola latest News
Akola latest NewsSaamtv
Published On

अक्षय गवळी, अकोला|ता. १७ फेब्रुवारी २०२४

Akola News:

अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वसाहत येथील कुख्यात गुंड शुभम संजय गवई याला मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. तर पोलीस स्टेशन जूने शहर येथे टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार शेख बादशहा शेख मेहबूब (वय-39 वर्षे) आणि शेख नाझीम शेख खालीक (वय 36 वर्षे दोन्ही रा-सोनटक्के प्लॉट) यांच्यावर कलम 55 मपोका प्रमाणे 2 वर्षाकरीता अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

शुभम गवई हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. अकोला पोलिसांनी एका महिन्यात जिल्ह्यातील दीड महिन्यात 4 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या सर्वांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारे एकुण 5 सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए अन्चये स्थानबध्द करण्यात आले आहे.

यामध्ये राहूल मोहन रंधवे (वय-23 वर्षे अकोट फाईल), मोहम्मद उमर मोहम्मद रियाज (वय-21 वर्षे रा-सैलानी नगर, डाबकी रोड अकोला), विनायक महेंद्र येन्नेवार (वय-24 वर्षे रा-डाबकी रोड, अकोला) ४) शेख कासम उर्फ गुड्या शेख कबीर (वय 29 वर्ष रा. गाडगे नगर, जुने शहर) आणि आता शुभम संजय गवई (वय 29 वर्ष रा. ईराणी झोपडपट्टी अकोला) या गुन्हेगाराविरूध्द अकोला पोलीस दलाने एमपीडीए नूसार कारवाई केली आहे.

Akola latest News
Maratha Reservation: सलग दुसऱ्या दिवशी राज्यात मराठा समाज आक्रमक; एसटी सेवा बंद, ठिकठिकाणी रास्ता रोको

पोलीस स्टेशन जूने शहर येथे टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार नामे शेख बादशहा शेख मेहबूब आणि शेख नाझीम शेख खालीक यांच्यावर कलम ५५ मपोका प्रमाणे ठाणेदार जुने शहर यांनी प्रस्ताव सादर केला होता. यावर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून, या टोळीतील दोन कलम 55 मपोका अन्वये 2 वर्षाकरीता अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Akola latest News
Sharad Pawar News: 'लोकांना धीर द्या, यश नक्की मिळेल..' बारामतीचं राजकारण तापलं; शरद पवारही मैदानात उतरले!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com