Akola News: हुबेहूब मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे दिसणारे तुळशीराम गुजर यांचा वंचितमध्ये प्रवेश

Manoj Jarange Patil Duplicate: अकोला जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडला धक्का बसलाय. ब्रिगेडच्या महानगर अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी वंचितमध्ये प्रवेश केलाय.
Tulshiram Gujar joined party in vanchit bahujan aghadi party
Tulshiram Gujar joined party in vanchit bahujan aghadi partySaam TV
Published On

Akola News:

अकोला जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडला धक्का बसलाय. ब्रिगेडच्या महानगर अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी वंचितमध्ये प्रवेश केलाय. संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष तथा मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश ढोरे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय.

अकोल्यातल्या आंबेडकरांच्या यशवंत भवन निवासस्थानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार झालाय. योगेश ढोरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी अनेक आंदोलन, सामाजिक उपक्रम, विमा संदर्भात, तसेच नुकसान भरपाई करिता शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी ब्रिगेडची साथ सोडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वार ठेऊन वंचित आघाडीत आज प्रवेश घेतला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tulshiram Gujar joined party in vanchit bahujan aghadi party
Prakash Ambedkar: महाविकास आघाडी इंडिया आघाडीप्रमाणे संपुष्टात येणार नाही: प्रकाश आंबेडकर

उपजिल्हाप्रमुख मंगेश माकोडे, जिल्हासंघटक कुशल जैन, जिल्हाप्रमुख वाहतूक आघाडीचे सिदार्थ तायडे, उपशहर प्रमुख संदीप उपरवटसह इतर प्रमुख पदाधिकारी आणि 40 ते 50 कार्यकर्त्यांनी वंचित यांनी प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

हुबेहूब दिसणारे मनोज जरांगे पाटीलांचाही वंचितमध्ये प्रवेश...

अकोला शहरात हुबेहूब मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसणारे तुळशीराम गुजर यांनीही वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केलाय. अकोल्यातील जुन्या शहरात राहणारे तुळशीराम गुजर हे हुबेहूब मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात. जेव्हा ते अकोला शहरातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निघाले होते. त्यावेळी अनेकांनी त्यांना पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.

Tulshiram Gujar joined party in vanchit bahujan aghadi party
Digital Orange Market: देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ठरतंय वरदान

तुळशीराम गुजर हे अकोला शहरातील जुने शहर वस्तीत राहतात. ते म्हणाले होते की, त्यांना अभिमान वाटतो की, मी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा दिसतो. मला अनेकांनी सांगितले, माझ्या सोबत सेल्फीही घेतल्या. गुजर हे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चरणगाव या ठिकाणी गेले होते. इतकेच नाही तर, जरांगे पाटील यांच्या जिथे सभा झाल्या त्या ठिकाणी ते उपस्थित होते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com