Political contest intensifies in Massajog as a new challenger enters the bypoll against late Sarpanch Santosh Deshmukh’s wife. Saam tv
महाराष्ट्र

बीड मस्साजोगची निवडणूक बिनविरोध नाही; संतोष देशमुखांच्या पत्नीच्या विरोधात बडा नेता मैदानात

Beed Massajog Gram Panchayat Bypoll Beed Details: बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख मैदानात उतरल्याने निवडणूक रंगणार आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे मस्साजोगची निवडणूक आता बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच रंगत निर्माण झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता या लढतीकडे लागले आहे.

न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावे

सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरपंच पदावरून संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहून पतीला न्याय कसे भेटेल हेच त्यांनी बघितले पाहिजे, असा सल्लाच स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांना दिला.

दिवंगत संतोष देशमुख यांच्या न्यायालयीन लढाईसाठी आजही आणि उद्याही गाव पाठीशी राहील. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जो पर्यंत शिक्षा होत नाही, तो पर्यंत आमचे गाव एकत्र आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्व ग्रामस्थांचा उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढवणार असल्याचे स्वरूपानंद देशमुख यांनी स्पष्ट केले.

निवडणूक, निकाल कधी असणार?

अर्ज दाखल - 7 ते 13 एप्रिल

अर्जाची छाननी - 15 एप्रिल

अर्ज मागे घेण्याची तारीख - 17 एप्रिल

मतदान - 28 एप्रिल

निकाल - 29 एप्रिल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Girl Trend: 'क्लीन गर्ल ब्युटी ट्रेंड' काय आहे? तुम्ही पण या सोप्या ट्रिक फॉलो करुन मिळवा 'क्लीन गर्ल ब्युटी ट्रेंड'

Chana Dal Pakoda Recipe: संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत चण्याच्या डाळीची भजी, रेसिपी होईल भारी

भाजपचा 'हा' नेता म्हणजे दुसरा अशोक खरात, त्यानं पोरींची इज्जत लुटली; शिंदेसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

Shocking : बॉयफ्रेंडच्या मित्रांनी केली शरीर सुखाची मागणी, नकार देताच महिलेसोबत भयंकर घडलं

Numerology: 'या' मूलांकाचे लोक असताना प्रतिभावान; 'जे लाथ मारतात तेथे काढतात पाणी', संधीचं करतात सोनं

SCROLL FOR NEXT