Pancreatic Cancer: सायलेंट किलर मानला जातो पॅनक्रियाज कॅन्सर; शरीरात होणाऱ्या या बदलांकडे लक्ष द्या, डॉक्टरांची महत्त्वाची माहिती

Digestive Enzyme Deficiency Symptoms: स्वादुपिंडाचा कॅन्सर सायलेंट किलर मानला जातो. सुरुवातीला दिसणारी लक्षणं साधी वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
Digestive Enzyme Deficiency Symptoms
Digestive Enzyme Deficiency Symptomssaam tv
Published On

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं प्रमाण वाढताना दिसतंय. यामध्ये पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाच्या कॅन्सरला सायलेंट किलर म्हणतात. अनेकदा या कॅन्सरची लक्षणं आपल्याला दिसतात मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

पोटाच्या मागच्या बाजूला असलेला पॅनक्रियाज म्हणजेच स्वादुपिंड हा लहान पण अत्यंत महत्त्वाचा अवयव असतो. तो अन्न पचवण्यासाठी आवश्यक एन्झाइम तयार करतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या अवयवात कॅन्सर झाल्यास सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यावेळी हा कॅन्सर गंभीर स्टेजमध्ये जातो त्यावेळी रूग्णांना तो लक्षात येतो.

वैद्यकीय रिपोर्ट्सनुसार, या कॅन्सरमध्ये दिसून येणारी सुरुवातीची लक्षणं खूप सामान्य असतात. यामध्ये हलकी पोटदुखी, पाठदुखी किंवा थोडंसं खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटणं ही लक्षणं साधारण गॅस किंवा तणावामुळेही होऊ शकतात. त्यामुळे अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

काही रुग्णांमध्ये मळमळ, पचनात बदल अशी लक्षणंही दिसू शकतात. ही लक्षणं थोडा वेळ दिसतात आणि त्यानंतर निघून जातात. त्यामुले लोक त्याला गंभीर समजत नाहीत. पण ही समस्या सतत होत राहिली, तर ती धोक्याची घंटा ठरू शकते.

Digestive Enzyme Deficiency Symptoms
Cancer Symptoms: तरूणांनो शरीरात ही लक्षणं दिसतायत तर व्हा सावध; शरीरात सायलेंट कॅन्सर करतोय घर

पिवळी कावीळ ही एक महत्त्वाचं लक्षणं मानली जाते. यात त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. हे शरीरात बिलीरुबिन वाढल्यामुळे होतं. ट्यूमरमुळे पित्तनलिका बंद झाल्यास अशी स्थिती निर्माण होते. त्यासोबतच गडद रंगाचं लघवी, फिकट रंगाचा मल आणि त्वचेला खाज येणंही दिसू शकतं.

अचानक वजन घटणं

कोणताही कारण नसताना वजन कमी होणं हा देखील महत्त्वाचा इशारा मानला जातो. पॅनक्रियाज योग्य प्रमाणात एन्झाइम तयार करू शकत नसल्यामुळे शरीराला पोषक तत्त्वं नीट शोषता येत नाहीत. त्यामुळे शरीर कमकुवत होतं.

Digestive Enzyme Deficiency Symptoms
Cancer: अचानक ताप अन् थकवा जाणवतो? ही कॅन्सरची लक्षणे नाहीत ना? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

ब्लड शुगर अचानक वाढणं

काही रुग्णांमध्ये अचानक डायबिटीज होण्याची शक्यता असते. ज्यावेळी तुमच्या रक्तातील साखर अचानक वाढू लागले तेव्हा त्याचा पॅनक्रियाजवर परिणाम होतो.

Digestive Enzyme Deficiency Symptoms
Liver tumor: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यावर शरीर कसं सांगतं? ही महत्त्वाची 5 लक्षणं जाणून घ्या

सतत थकवा जाणवणं, भूक कमी होणं आणि शरीरात वेगळे बदल जाणवणं ही देखील स्वादुपिंडाच्या कॅन्सरची लक्षणं असतात. त्यामुळे यापैकी तुम्हाला कोणतीही लक्षणं दिसून आली तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांची मदत घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com