Masked Aadhaar Card Saam TV
महाराष्ट्र

Masked Aadhaar Card: हॉटेलमध्ये रूम बूक करताना आधार कार्ड देताय? सावधान! तुमचं बँक खातं रिकामं होण्याआधी करा 'हे' बदल

Masked Aadhaar Number: आधारकार्डचा क्यू आर कोड आणि आधार क्रमांकाचा वापर करून आपल्या माहितीचा चूकीचा वापर तसेच फसवणूकीच्या घटना समोर आल्या आहेत.

Ruchika Jadhav

Aadhaar Card News:

आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. बँकेसह रुम बुकींग, नवीन सीमकार्ड खरेदी यांसह अनेक छोट्या मोठ्या कामांमध्ये आधार कार्ड मागितलं जातं. आधार कार्डमध्ये आपली सर्व माहिती असते. त्यामुळे अनेक ठिकाणी आधार कार्डचा गैरवापर झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हॉटेलमध्ये (Hotel) राहण्यासाठी रुम बूक केल्यावर देखील आधी आधार कार्ड तपासले जाते. आधार कार्ड स्कॅन केले जाते. अशावेळी आधारकार्डचा क्यू आर कोड आणि आधार क्रमांकाचा वापर करून आपल्या माहितीचा चूकीचा वापर तसेच फसवणूक होण्याची शक्यता असते. आपल्यासोबत देखील अशीच घटना घडूनये यासाठी प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे.

आधारकार्डच्या (Aadhar Card) क्यू आर कोडपेक्षा त्यावर असलेल्या क्रमांकाचा वापर करून जास्त प्रमाणात फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. आता यावेळी तुमचा आधार कार्डचा संपूर्ण नंबर समोरच्या व्यक्तीकडे जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे. त्यासाठी शासनाने मास्क आधार ही स्किम आणलीये. त्यामार्फत तुम्ही अशा फ्रॉडपासून स्वताचा बचाव करू शकता.

मास्क आधार कार्ड

आधार कार्डमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने यावर तोडगा आणला असून मास्क आधार कार्ड आणलं आहे. यामध्ये आधारचे शेवटचे फक्त ३ अंक दिसतात. बाकीचे अंक लपलेले असतात. त्यामुळे तुम्ही जर कोठेही तुमचे आधार कार्ड स्कॅन केले तर त्यातून तुमची संपूर्ण माहिती समोरच्या व्यक्तीला मिळवता येत नाही.

मास्क आधार कसं डाउनलोड करायचं?

  • यासाठी सर्वात आधी आधारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • तुम्हाला थेट https://eaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

  • पुढे तुम्हाला १२ अंकी तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.

  • त्यानंतर I want a masked Aadhaar हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल.

  • कॅप्चा कोड त्यात टाकून तो पूर्ण करा.

  • यानंतर तुम्हाला आधारशी लिंक असलेल्या क्रमांकावर एक OTP येईल.

  • यावरून तुम्ही ई-आधार कार्ड कॉपी डाउनलोड करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT