Jawan Rameshwar Kakade Saam Tv
महाराष्ट्र

Barshi: हुतात्मा रामेश्वर काकडे यांना गौडगावात साश्रुपुर्ण नयनांनी निराेप

त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात हाेती.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : अमरे रहे अमर रहे रामेश्वर काकडे अमरे रहे अशा घाेषणा देत सोलापुरातल्या (solapur) बार्शीतील (barshi) हुतात्मा जवान रामेश्वर काकडे (rameshwar kakade) यांना भावपुर्ण निराेप देण्यात आले. रामेश्वर काकडे (jawan rameshwar kakade) बुधवारी छत्तीसगड (chhattisgarh) येथे कर्तव्यवार असताना हुतात्मा झाले. गुरुवारी रात्री दीड वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा रामेश्वर काकडे यांना अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात हाेती. (solapur latest marathi news)

हुतात्मा रामेश्वर काकडे हे बार्शीतील गौडगाव येथील रहिवासी होते. ते सन २०१२ कालावधीत सैन्यदलात रुजू झाले होते. त्यांनी देशातील विविध भागात सेवा बजावली. सध्या ते छत्तीसगड राज्यातील रायपूर (raipur) भागात कार्यरत होते. बुधवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सैन्य रुग्णालयात ही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांच्यावतीने देण्यात आली.

गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव बार्शीत दाखल झाले. रात्री दीड वाजता त्यांचे मूळगाव गौडगाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना वडील वैजिनाथ काकडे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी सीआरपीएफच्या (CRPF) वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी गावक-यांनी हुतात्मा रामेश्वर काकडे यांना भावपुर्ण निराेप दिला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यासह शेकडाे ग्रामस्थ उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोमहर्षक अंतिम सामना! वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर दिल्लीचा ‘दबंग’ विजय; पुणेरी पलटनच्या संस्मरणीय हंगामाचा भावनिक शेवट

Powai Kidnapping Shock: पवईतील अपहरणाचा थरार, रोहितच्या एन्काऊंटरची इनसाईड स्टोरी

नेपाळ, बंगालनंतर आता 'या' देशातील सरकारविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर; आंदोलनादरम्यान ७०० जणांचा मृत्यू

'सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा फसवलं,कर्जमाफी आश्वासनावर जरांगेंची टीका

Free Mobile Recharge Plan for One Year: मोदींकडून वर्षभर मोबाईल फ्री रिचार्ज? 1 GB डेटाही क्षुल्लक किंमतीत मिळणार?

SCROLL FOR NEXT