Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News: ऑटो घेण्यास पैसे आणण्यासाठी माहेरच्या मंडळींकडून छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

ऑटो घेण्यासाठी माहेरवरून 80 हजार रुपये घेऊन यावेत म्हणून तिचा छळ करण्यात येत होता.

Gangappa Pujari

दिपक क्षिरसागर, लातूर

Latur: पैशांसाठी होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जळकोट तालुक्यातील चिंचोली येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून लातूर जिल्ह्यातील जळकोट पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीहरी तुकाराम वाघमारे यांची मुलगी सायली हिचे लग्न 20 मे 2018 रोजी दत्ता भानुदास कांबळे याच्याशी झाले होते. लग्नानंतर सहा महिने तिला सासरी चांगले नांदवले. त्यानंतर नवरा दत्ता भानुदास कांबळे, सासू तुळसाबाई भानुदास कांबळे, सासरा भानुदास कांबळे, दीपक भानुदास कांबळे आणि जाऊ भाग्यश्री दीपक कांबळे हे तिला स्वयंपाक येत नाही, तु आम्हाला पसंत नाही असे म्हणून टोमणे मारून शिवीगाळ करू लागले. तसेच तिचा छळ करू लागले.

याबद्दल मुलीने आपल्या घरीही सांगितले होते. मात्र एखादे मुल झाल्यावर हे प्रकार बंद होतील असे म्हणत त्यांनी तिची समजूत काढली होती. मात्र एक मुलगी झाली तरी तिचा छळ थांबला नाही. ऑटो घेण्यासाठी माहेरवरून 80 हजार रुपये घेऊन यावेत म्हणून तिचा छळ करण्यात येत होता.

सासरच्या मंडळींच्या याच छळास कंटाळून साडीने घरातील पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latur News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा उद्याच मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

Sharad Pawar Speech : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, मातोश्रींना माहीतच नव्हतं; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

Vaibhav Suryavanshi: वय वर्ष फक्त १३! वैभव सूर्यवंशीवर या संघाने लावली कोटींची बोली

SCROLL FOR NEXT