IND Vs NZ 1st T20 : वनडेतील 'शेर' टी-20 मध्ये 'ढेर', न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

पहिल्या टी-20 सामन्यांत न्यूझीलंडने टीम इंडियाचा दारुण पराभव केला.
IND Vs NZ 1st T20 Match
IND Vs NZ 1st T20 MatchSaam TV

IND Vs NZ 1st T20 Live Updates : सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने करून दिलेली जबदस्त सुरूवात आणि डॅरेन मिचेलने शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या बळावर न्यूझीलंडने टीम इंडियासमोर विजयासाठी १७७ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचे ओझे टीम इंडियाच्या फलंदाजाला पेलले नाही. त्यांनी ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे पहिल्या टी-20 सामन्यांत न्यूझीलंडने टीम इंडियाचा दारुण पराभव केला.  (India vs New Zealand 1st T20I)

IND Vs NZ 1st T20 Match
Washington Sundar Catch : सुंदरचा अतिसुंदर झेल, पाहून सगळेच अवाक्, सुपरमॅन वॉशिंग्टनचा VIDEO पाहाच

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शेवटपर्यंत लढला मात्र, तो देखील एकटा पडला. वाशिंग्टन सुंदरने २७ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. भारतीय संघाकडून (Team India) खेळली ही सर्वात मोठी खेळी आहे. या विजयासह न्यूझीलंड संघाने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

रांचीत खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यांत न्यूझीलंडकडून भारताला (IND vs NZ) विजयासाठी १७७ धावांचं आव्हान मिळालं होता. धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाला, निर्धारित २० षटकांत ९ बाद १५५ धावाच करता आल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने ४७ धावा आणि सुंदरने ५० धावांची सुंदर खेळी केली. इतर कोणत्याही फलंदाजाचा न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. त्यामुळे न्यूझीलंड संघाने २१ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

तत्पुर्वी नाणेफेक गमावल्यानंतर न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. सलामीवीर फिन ॲलन (३५ धावा) आणि डेव्हॉन कॉनवे यांनी आक्रमक सुरुवात केली होती. दोघांनीही पहिल्या विकेट्साठी ६० धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने एका षटकात दोन धक्के देत भारताला कमबॅक करून दिले होते. कॉनवे ५२ धावांवर बाद झाला.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या डॅरील मिचेल भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मिचेलने अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले. अर्शदीप सिंगने टाकलेल्या २० व्या षटकात त्याने २७ धावा चोपल्या.  त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला भारतासमोर विजयासाठी १७६ धावांचं आव्हान उभं करता आलं. मिचेल ५९ धावांवर नाबाद राहिला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com